वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
हिरे व्यवसाय क्षेत्राची जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी वाणिज्य विभागाकडून डायमंड इम्प्रेस्ट ऑथरायझेशन योजना
एमएसएमई हिरे निर्यातदारांना पाठिंबा देणारी आणि देशांतर्गत उद्योगाचे रक्षण करण्यासाठी योजना
Posted On:
21 JAN 2025 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने 21 जानेवारी 2025 ‘डायमंड इम्प्रेस्ट ऑथरायझेशन’ (डीआयए) योजनेचा प्रारंभ केला.भारतातील हिऱे व्यापार क्षेत्राची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे. ही योजना नैसर्गिक कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या शुल्कमुक्त आयातीसाठी सुव्यवस्थित यंत्रणा पुरवले त्यामुळे मूल्यवर्धनाला प्रोत्साहन आणि निर्यातीला चालना मिळेल. ही योजना 1 एप्रिल, 2025 पासून लागू करण्यात येईल.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये:
या योजनेतून 1/4 कॅरेट (म्हणजे 25 सेंट) पेक्षा कमी वजनाच्या नैसर्गिक कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी आहे.
या योजनेत 10% मूल्यवर्धनासह निर्यात दायित्व अनिवार्य आहे.
‘टू स्टार एक्सपोर्ट हाऊस’ दर्जा धारक आणि त्यावरच्या श्रेणीतले आणि दरवर्षी 15 दशलक्ष आणि त्याहून जास्त अमेरिकन डॉलर्स मूल्यांचे हिरे निर्यात करणारे सर्व हिरे निर्यातदार या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
ही योजना बोत्सवाना, नामिबिया अंगोला इत्यादि ठिकाणच्या अनेक नैसर्गिक हिरे खाण देशांनी अंगिकारलेल्या लाभार्थी धोरणांच्या अनुशंगाने ही योजना तयार करण्यात आली आहे जिथे हिरे उत्पादक मूल्यवर्धनाच्या किमान टक्केवारीसाठी कट आणि पॉलिशिंग सुविधा उघडण्यास बांधील आहेत. ही योजना हिरे उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीत जागतिक आघाडीवर भारताचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी आहे.
नवीन योजना भारतीय हिरे निर्यातदारांना, विशेषतः एमएसएमईमधील निर्यातदारांना, समान संधी प्रदान करण्यासाठी तयार केली आहे,यामुळे त्यांना विस्तारित क्षेत्रामध्ये प्रभावीपणे स्पर्धा करता येईल.हिरे खाणकामाच्या ठिकाणी भारतीय हिरे व्यावसायिकांकडून संभाव्य तेजी रोखण्यासाठी ही योजना आहे.याव्यतिरिक्त, या योजनेमुळे देशातच हिरे क्षेत्रात विशेषतः ‘सेमी- पॉलिश’ हिरे कारखान्यांमध्ये अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील,अशी अपेक्षा आहे.भारतीय निर्यातदारांना सुविधा देऊन, ते देशांतर्गत हिरे प्रक्रिया उद्योगाचे संरक्षण होवू शकेल. त्यामुळे हिरे संबंधित रोजगार टिकवून ठेवण्याचा प्रयत्न होवू शकणार आहे.
डीआयए योजना जागतिक हिऱ्यांच्या व्यापारात भारताचे एक अग्रगण्य खेळाडू म्हणून स्थान मजबूत करणारी आहे. या योजनेमुळे आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन सुनिश्चित होणार आहे आणि व्यवसाय सुलभतेने करणे शक्य होणार आहे.या योजनेमुळे हिरे उद्योगात कुशल कारागिरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि भारतामध्ये कटिंग आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची निर्यात वाढेल अशी अपेक्षा आहे.
हिरे उद्योगाशी संबंधित निर्यातीत मोठी घट होत आहे आणि कामगारांच्या रोजगाराचे नुकसान होत आहे. या योजनेमुळे हिरे व्यवसायातील या आव्हानाला तोंड देता येईल, हिरे उद्योगाला या योजनेमुळे पुनरुज्जीवित करणे शक्य होईल,अशी अपेक्षा आहे.
पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094951)
Visitor Counter : 19