आदिवासी विकास मंत्रालय
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025
Posted On:
21 JAN 2025 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 जानेवारी 2025
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने 20 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ‘राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025’चे आयोजन केले होते. भारतातील आदिवासी समुदायांना भेडसावणाऱ्या गंभीर आरोग्य समस्या आणि त्यांना निरामय आरोग्य सेवा प्रदान करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत हा एक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक उपक्रम घेण्यात आला.
भौगोलिक विलगीकरण (दूरवर असलेल्या पाडे-वस्त्यांमुळे आलेले विलगीकरण)सामाजिक-आर्थिक वंचितता आणि खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक परंपरांमुळे भारतातील आदिवासी समुदायांना अनेकदा खूप वेगळ्या, अशा आरोग्यविषयक आव्हानांना तोंड द्यावे लागते. या घटकांमुळे आरोग्यसेवेच्या उपलब्धतेमध्ये आणि फलनिष्पत्तीमध्ये लक्षणीय असमानता निर्माण होते.यामुळे यासाठी विशेष लक्ष आणि उपाय योजण्याची आवश्यकता आहे.
या आव्हानांना प्रतिसाद म्हणून,भारत सरकारने अनेक परिवर्तनकारी पावले उचलली आहेत. आदिवासी आरोग्यसेवेतील महत्त्वाचे प्रयत्न आणि उपक्रम:
आदिवासी व्यवहार मंत्रालयाने,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच एम्सच्या सहकार्याने आणि इतर भागधारकांच्या मदतीने,भगवान बिरसा मुंडा आदिवासी आरोग्य आणि रक्तविज्ञान : क्षमता केंद्रे (सीओसी), सहयोगी दृष्टिकोन यासारखे अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद 2025 मध्ये प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्यात आले . या कार्यक्रमात धोरणात्मक हस्तक्षेप, कृती-केंद्रित संशोधन आणि आदिवासी आरोग्यसेवा व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अभ्यासक्रमात सुधारणा करण्याच्या उपक्रमांसाठी प्राधान्य क्षेत्रे ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
उद्घाटन सत्रातील ठळक मुद्दे:
या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओराम यांनी केले.
देशभरातून 400 हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेला हजेरी लावली.
उद्घाटन सत्रानंतर, विविध केंद्रित विषयांवर चर्चा झाली:
अपेक्षित निष्कर्ष :
1. आदिवासी प्रदेशांमध्ये आरोग्यसेवा पुरवठ्यात वाढ करण्यासाठी एक धोरणात्मक पथदर्शी कार्यक्रम
2. औपचारिक आरोग्यसेवा प्रणालींमध्ये पारंपरिक उपचार करणारे आणि पद्धतींचे एकत्रीकरण.
3. कुपोषणाचा सामना करण्यासाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य दक्षतेला प्रोत्साहन देण्यासाठी पोषण-केंद्रित उपक्रम.
4. दुर्मिळ आजार, व्यसन आणि मानसिक आरोग्य समस्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लक्ष्यित हस्तक्षेप.
5. समुदायाच्या सहभागासह आणि तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणासह सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करणे.
2025 मधील राष्ट्रीय आदिवासी आरोग्य परिषद ही आदिवासी समुदायांच्या समग्र विकासासाठी भारत सरकारच्या वचनबद्धतेमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. सहकार्य, नवोपक्रम आणि समावेशकता वाढवून, हा उपक्रम भारतातील आदिवासी लोकसंख्येच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करताना, त्यांना शाश्वत आरोग्यसेवा उपाय प्रदान करण्याचा हा प्रयत्न आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094855)
Visitor Counter : 19