इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने(यूआयडीएआय) सुविहित सेवा वितरणात वाढ करण्यासाठी बीएफएसआय,फिनटेक आणि दूरसंचार कंपन्यांसोबत हितधारकांची आयोजित केली बैठक
आधार चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांनी ओलांडला 100 कोटींचा टप्पा, पाच महिन्यात झाले दुप्पट व्यवहार
Posted On:
20 JAN 2025 1:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 20 जानेवारी 2025
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने बीएफएसआय, फिनटेक आणि दूरसंवाद क्षेत्रातील धुरिणांसोबत आधारचा वापर करून सेवांचे वितरण अधिक कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने संबंधित हितधारकांची एक दिवसीय बैठक आयोजित केली होती. सुमारे 500 वरिष्ठ धोरणकर्ते, उद्योग धुरीण, तज्ञ, तंत्रज्ञान विशेषज्ञ, , बँका ,विमा कंपन्या, एनपीसीएल, बाजार मध्यस्थ, दूरसंवाद सेवा पुरवठादार, फिनटेक उद्योजक आदी, महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या “आधार संवाद” या कार्यक्रमात एकत्र आले.
100 कोटी आधार चेहरा प्रमाणीकरण व्यवहार
या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाच्या टप्पा मांडण्यात आला. तो म्हणजे आधारच्या चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांनी ओलांडलेला 100 कोटींचा टप्पा. 2021 मध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरूवात झाल्यापासून आधारच्या चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती यात देण्यात आली. एआय/एमएल आधारित चेहरा प्रमाणीकरण या यूआयडीएआयकडून स्वतः विकसित केलेल्या सुविधेचा वापर गेल्या वर्षापासून अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. संचित चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांची संख्या गेल्या सुमारे 5 महिन्यात 50 कोटींवरून दुप्पट होऊन 100 कोटींवर पोहोचली आहे.
या हितधारकांच्या बैठकीला संबोधित करताना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे(मेती) सचिव एस. कृष्णन् यांनी आधारचा लोकसंख्येच्या प्रमाणात होणारा वापर आणि आधार कशा प्रकारे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा पाया बनले आहे हे अधोरेखित केले. अधिकाधिक लोकांना सक्षम करण्यासाठी आणि जीवनसुलभता आणखी वाढवण्यासाठी यूआयडीएआयने सर्व हितधारकांसोबत काम सुरू ठेवण्याचा त्यांनी आग्रह धरला.यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी डिजिटल व्यवहारांवर जनतेचा विश्वास वाढवण्यामध्ये आधारच्या परिवर्तनकारी भूमिकेवर भर दिला. देशाच्या विकासाच्या मार्गासोबत आणि जनतेच्या आकांक्षांसोबत यूआयडीएआय नेहमीच राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
यूआयडीएआयचे अध्यक्ष आणि सीईओ नीळकंठ मिश्रा यांनी आधारचा देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाढलेला वापर आणि त्यामधील प्रचंड क्षमता अधोरेखित केली.चेहरा प्रमाणीकरण व्यवहारांनी 100 कोटींचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी भारताच्या डिजिटल ओळख परिसंस्थेचा कणा असल्याच्या आधारच्या स्थानाची पुष्टी करणारी आहे. नागरिक केंद्रित संघटना म्हणून आधार क्रमांक धारकांना सेवांचे वितरण अतिशय सहजपणे करून त्यांचे जीवन सुकर करण्याचा आमचा दृष्टीकोन आहे, असे कुमार यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सह-यजमानपद भूषवल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले.
विविध संकल्पनांवर विचारमंथन, चौकटींची निर्मिती आणि वापरकर्त्याच्या वापरात सुधारणा यावर या हितधारकांच्या बैठकीत चार केंद्रित पॅनेलमध्ये भर देण्यात आला.उद्योग धुरिणांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पॅनेल चर्चा आधार चेहरा प्रमाणीकरणाचा अधिक चांगल्या बँकिंग सेवा देण्यासाठी, बिगर बँकिंग वित्तीय सेवा आणि फिनटेकची सेवासुलभता वाढवण्यासाठी आणि दूरसंवाद सेवा पुरवठादारांकडून प्रमाणीकरणाच्या सुविधेत अधिक जास्त सुधारणा करण्यासाठी वापर कशा प्रकारे करता येईल यावर आधारित होत्या. सुरक्षित डिजिटल भविष्यावरही या पॅनेलनी विचारमंथन केले. आधार संवाद मालिकेतील हा दुसरा भाग होता, यापूर्वी बंगळूरुमध्ये नोव्हेंबर महिन्यात पहिला आधार संवाद झाला होता.
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2094768)
Visitor Counter : 26