भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारतीय निवडणूक आयोगाकडून या आठवड्यात निवडणूक व्यवस्थापन संस्थांची परिषद आयोजित

Posted On: 20 JAN 2025 8:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 20 जानेवारी 2025


भारतीय निवडणूक आयोग राष्ट्रीय मतदार दिनाच्या आधी येत्या 23 आणि 24 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे दोन दिवसीय "जागतिक निवडणूक वर्ष 2024: लोकशाहीच्या स्थानाची पुनरावृत्ती, निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी एक महत्वपूर्ण फलनिष्पत्ती" या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे. 2024 या वर्षात जगभरातील निम्मी लोकसंख्या असलेल्या म्हणजे सुमारे 70 देशांमध्ये निवडणुका घेण्यात आल्याने हे वर्ष एक अतिशय असामान्य वर्ष ठरले. या पार्श्वभूमीवर समकालीन निवडणूक व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चिंतन करणे आणि निवडणुकांचा संभाव्य दृष्टिकोनावर महत्त्वपूर्ण शिकवण प्राप्त करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत जगभरातील विविध देशांना, विशेषतः उदयोन्मुख निवडणूक व्यवस्थापन संस्थांना 2024 मधील भारतातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेबद्दल सर्वांगीण माहिती मिळणार आहे.  जगभरातील या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेतून  सर्व निवडणूक व्यवस्थापकांना बरेच काही शिकण्यासारखे आहे.

भारतीय निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि जागतिक निवडणूक संस्थांच्या संघटनेच्या भारतातील शाखेने (A-WEB) संयुक्तपणे आयोजित केलेल्या या परिषदेचे उदघाटन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हस्ते होणार असून यामध्ये अनेक देशातील निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विषयांवर सत्रे होणार आहेत.

या परिषदेत भूतान, जॉर्जिया, नामिबिया, उझबेकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, कझाकिस्तान, आयर्लंड, मॉरिशस, फिलीपिन्स, रशियन फेडरेशन, ट्युनिशिया आणि नेपाळ यासह 13 देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे (ईएमबीज) जवळपास 30 प्रतिनिधी सहभागी होतील. भूतान, कझाकस्तान, नेपाळ, मॉरिशस, नामिबिया, इंडोनेशिया, रशियन फेडरेशन, श्रीलंका, ट्युनिशिया आणि उझबेकिस्तानमधील निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे  प्रमुख/उपप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्य संस्था, निवडणूक यंत्रणांसाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानाचे (आयएफईएस)चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  A-WEB चे महासचिव यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत. दिल्लीस्थित अनेक राजदूत/उच्चायुक्त देखील परिषदेत सहभागी होतील.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या बीजभाषणाने या परिषदेला सुरुवात होईल आणि यामध्ये निवडणूक व्यवस्थापनाविषयी अनेक सत्रांचे आयोजन केले जाईल.

या परिषदेच्या समारोपाच्या दिवशी, निवडणुका आणि लोकशाहीचा उत्तम समन्वय तसेच त्यांच्या बळकटीकरणासाठी जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांसाठी आवश्यक वचनबद्धता आणि कृती करण्यायोग्य शिफारसींवर चर्चा होईल तसेच या चर्चेला अंतिम रूप दिले जाईल.

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2094645) Visitor Counter : 13


Read this release in: English , Urdu , Hindi