सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी घेतला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा

Posted On: 13 JAN 2025 8:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 13 जानेवारी 2025


केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून देशातील खादी आणि ग्रामोद्योगांच्या विकासासाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांच्या/ कार्यक्रमांच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, आयोगाचे सदस्य, एमएसएमई विभागाचे सचिव, संयुक्त सचिव(एआरआय), आर्थिक सल्लागार, एमएसएमई, सीईओ, केव्हीआयसी, आणि एमएसएमईचे इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांनी देशात खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिक केंद्रित दृष्टीकोनाने प्रयत्नांची व्याप्ती वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला.

 

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2092636) Visitor Counter : 21


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil