संरक्षण मंत्रालय
छात्रांना वास्तविक जगातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी डीजी एनसीसीने आयोजित केलेल्या 'आयडिया अँड इनोव्हेशन कॉम्पिटिशन'चे नवी दिल्ली येथे उद्घाटन
Posted On:
10 JAN 2025 3:08PM by PIB Mumbai
राष्ट्रीय छात्र सेनेचे (नॅशनल कॅडेट कोर) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 10 जानेवारी 2025 रोजी एनसीसी बिल्डिंग, सफदरजंग, नवी दिल्ली येथे 'आयडिया अँड इनोव्हेशन (कल्पना आणि नवोन्मेश) कॉम्पिटिशन' या स्पर्धेचे उद्घाटन केले. एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात (आरडीसी) प्रथमच हाती घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, छात्रांना सूक्ष्म विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि मार्गदर्शन देण्यात आले.
स्पर्धेपूर्वी एनसीसीने सर्व, म्हणजे 17 एनसीसी राज्य संचालनालयांच्या अधिपत्याखाली देशभरात कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन केले होते, छात्रांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि त्यांना प्रेरणा देणे, हे त्याचे उद्दिष्ट होते. या उपक्रमाचा लक्षणीय परिणाम दिसून आला, ज्यामध्ये छात्रांनी 256 नवोन्मेशी कल्पना आणि उपाय शोधले. यापैकी 56 सर्वोत्तम नवोन्मेशी कल्पनांची निवड करण्यात आली आणि प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये त्या प्रदर्शित करण्यात आल्या. या नवोन्मेशी कल्पनांनी छात्रांची चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता, सृजनशीलता, टीमवर्क आणि राष्ट्रउभारणीप्रति असलेली बांधिलकी अधोरेखित केली.
आयडिया अँड इनोव्हेशन स्पर्धेने छात्रांमध्ये उद्योजकता, समस्येचे निराकरण करण्याची क्षमता आणि नवोन्मेशाची ऊर्जा खोलवर बिंबवली. या उपक्रमाने केवळ भविष्यातील नेतृत्वाची जोपासना करण्याप्रति असलेले एनसीसीचे समर्पण अधोरेखित केले नाही, तर गंभीर सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्याची युवा मनाची क्षमता देखील वाढवली.
एनसीसी प्रशिक्षणाची समकालीन पैलूंशी सांगड घालणे, आणि छात्रांना 'युवा सेतू'चा परिचय आणि संधी देऊन, त्यांना 'विकित भारत'साठी सज्ज करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते.
***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2091819)
Visitor Counter : 29