संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन संचलन 2025 पाहण्यासाठी 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रण
Posted On:
09 JAN 2025 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025
राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये 'लोकसहभाग' वाढवण्याच्या उद्देशाने, 26 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी सुमारे 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. विविध पार्श्वभूमी असलेल्या, स्वर्णिम भारत’च्या या शिल्पकारांमध्ये, विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांचा आणि सरकारी योजनांचा सर्वोत्तम वापर करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे. सरकारच्या निवडक उपक्रमांमध्ये ज्या गावांनी निर्धारित लक्ष्ये साध्य केली आहेत, अशा गावांच्या सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाने पंचायतींमध्ये राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जाहीर केली होती. ज्या पंचायतींनी सरकारच्या किमान सहा प्रमुख योजनांमध्ये लक्ष्य साध्य केले आहे त्यांची विशेष अतिथी म्हणून निवड करण्यात आली.
निमंत्रित पाहुण्यांपैकी काही जण बचत गटांच्या (SHG) माध्यमातून उत्पन्न आणि रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी असामान्य कार्य करत आहेत. अन्न, पोषण, आरोग्य, पाणी स्वच्छता आणि स्वच्छता, पंचायती राज संस्था-समुदाय आधारित संघटना, अभिसरण आणि महिलांशी संबंधित क्षेत्रातील उपक्रम यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या बचत गटांना आमंत्रित करण्यात आले आहे. दिल्लीला भेट न दिलेल्या बचत गटांच्या सदस्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
पीएम-जनमन मिशन सहभागी, आदिवासी कारागीर/वनधन विकास योजना सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आदिवासी अर्थसहाय्य आणि विकास महामंडळ उपक्रम, आशा सेविका, मायभारत स्वयंसेवक यांना निमंत्रित केले आहे.
आपत्ती निवारण आणि पर्यावरण रक्षण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आपत्ती निवारण कर्मचारी, पाणी समिती, जल योद्धे, सामुदायिक संसाधन व्यक्ती, वन आणि वन्यजीव संवर्धन स्वयंसेवकांना प्रथमच निमंत्रित करण्यात आले आहे.पर्यावरण संवर्धनाला पाठबळ देणारे आणि पीएम सूर्यघर योजना आणि पीएम कुसुम योजनांतर्गत नवीकरणीय ऊर्जेचा वापर करणारे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे.
आपापल्या क्रीडा प्रकारात देशाला अभिमानास्पद कामगिरी करणारे पॅरा-ऑलिंपिक पथकातील सदस्य, बुद्धिबळ ऑलिंपियाड पदक विजेते, ब्रिज वर्ल्ड गेम्स रौप्य पदक विजेते आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेते यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. नवोन्मेष आणि उद्यमशीलतेच्या भावनेला प्रोत्साहन देत पेटंट धारक आणि स्टार्ट-अप्सना देखील विशेष पाहुणे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. अखिल भारतीय शालेय बँड स्पर्धा आणि वीर गाथा स्पर्धेतील विजेते ठरलेले देशभक्तीची भावना असणारे शालेय विद्यार्थी देखील प्रजासत्ताक दिन समारंभात विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभांव्यतिरिक्त, हे विशेष पाहुणे राष्ट्रीय युद्ध स्मारक, पंतप्रधान संग्रहालय आणि दिल्लीतील इतर प्रमुख ठिकाणांना भेट देतील. त्यांना संबंधित मंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी देखील मिळेल.
Some of the categories of special guests are as follows:
S No
|
Categories
|
1.
|
Sarpanches
|
2.
|
Sarpanches from top performing village
|
3.
|
Disaster Relief Workers
|
4.
|
Guests from Vibrant Villages
|
5.
|
Best performing Water Warriors
|
6.
|
Primary Agriculture Credit (PAC) Societies
|
7.
|
Best performing Pani Samitee
|
8.
|
Best performing Community Resource Person (Krishi Sakhi, Udhyog Sakhi etc.)
|
9.
|
Best Performing SHG members
|
10.
|
Best performing Trainees of DGT got training under national Skill Development Corporation (NSDC)
|
11.
|
PM YASHASVI Scheme
|
12.
|
Forest & Wildlife conservation volunteers/workers
|
13.
|
Handloom Artisans
|
14.
|
Handicraft Artisans
|
15.
|
Special Achievers and Tribal beneficiaries of various schemes
|
16.
|
ASHA (Accredited Social Health Activist)
|
17.
|
Mann Ki Baat Participants
|
18.
|
My Bharat Volunteers
|
19.
|
Paralympic Contingent & winners of International Sorts events
|
20.
|
Agriculture Infrastructure Fund (AIF) scheme, Farmers Producing Organization (FPO), Padma Awardee Farmers. PMKISAN, PMFBY, PMKSY
|
21.
|
PM Surya Ghar Yojna
|
22.
|
Renewable Energy workers
|
23.
|
Beneficiaries of PM KUSUM scheme
|
24.
|
Anganwadi Workers
|
25.
|
Road Construction Workers
|
26.
|
Best Start-Ups
|
27.
|
Best Patent Holders
|
28.
|
Best performing PM-VISHWAKARMA yojana Beneficiaries
|
29.
|
Best performing OM Matasya Sampada Yojana Beneficiaries
|
30.
|
Best performing Rashtriya Gokul Mission beneficiaries
|
31.
|
Guests from North Eastern States
|
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091476)
Visitor Counter : 32