लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्ष, ग्वेर्नसेमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल मंडळाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या (CSPOC) स्थायी समितीच्या बैठकीचे भूषवणार अध्यक्षस्थान
लोकसभा अध्यक्ष 07 ते 11 जानेवारी 2025 दरम्यान यूके, स्कॉटलंड आणि ग्वेर्नसेच्या अधिकृत भेटीवर जाणार
भारत 2026 मध्ये होणाऱ्या 28 व्या राष्ट्रकुल मंडळाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या (CSPOC) बैठकीचे भूषवणार यजमानपद
Posted On:
07 JAN 2025 9:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 जानेवारी 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 07 ते 11 जानेवारी 2025 या कालावधीत युनायटेड किंगडम (यूके), स्कॉटलंड आणि ग्वेर्नसे (गुहनझी) या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.
बिर्ला 07 ते 09 जानेवारी 2025 दरम्यान युनायटेड किंगडमला भेट देतील. ते यूकेच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांच्या निमंत्रणावरून यूके ला भेट देणार आहेत. यावेळी ते सर लिंडसे हॉयल आणि लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्सचे लॉर्ड स्पीकर- अल्क्लुथचे लॉर्ड मॅकफॉल यांचीही भेट घेतील. लंडनमधील आपल्या इतर कार्यक्रमांव्यतिरिक्त, ओम बिर्ला डॉ. बी.आर. आंबेडकर संग्रहालयाला भेट देतील, महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि यूकेमधील भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील.
बिर्ला स्कॉटलंडलाही भेट देतील आणि स्कॉटिश संसदेचे पीठासीन अधिकारी ॲलिसन जॉनस्टोन एमएसपी, आणि स्कॉटलंडचे पहिले मंत्री जॉन स्विनी एमएसपी यांच्याशी संवाद साधतील. ते स्कॉटिश संसदेच्या क्रॉस-पार्टी सदस्यांशी देखील संवाद साधतील.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 10 जानेवारी 2025 रोजी ग्वेर्नसे येथे राष्ट्रकुल मंडळाचे अध्यक्ष आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या (CSPOC) परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. 2026 मध्ये भारतात होणाऱ्या 28 व्या सीएसपीओसी चे यजमान म्हणून ते या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील. या बैठकीच्या वेळी ते इतर संसदेतील त्यांच्या समकक्षांचीही भेट घेतील.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2091033)
Visitor Counter : 30