श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनौपचारिक कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचे औपचारिकीकरण आणि विस्तार या क्षेत्रातील आव्हाने आणि नवकल्पनांवर चर्चा करण्यासाठी भारत करणार आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

Posted On: 06 JAN 2025 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025


भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटनेच्या सहकार्याने नवी दिल्लीत येत्या 20-21 जानेवारी 2025 रोजी  ‘अनौपचारिक कामगारांसाठी सामाजिक सुरक्षेचे औपचारिकीकरण आणि विस्तार : आव्हाने आणि नवकल्पना’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करणार आहे. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे यशोभूमी- इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर, येथे होणार आहे.

या परिसंवादाच्या निमित्ताने आशिया प्रशांत क्षेत्रातील 31 हून अधिक देशांतील 40 सामाजिक सुरक्षा संस्थांचे धोरणकर्ते, सामाजिक सुरक्षा क्षेत्रातील प्रशासक, तज्ञ आणि आणि अभ्यासक एकाच मंचावर एकत्र येतील. अनौपचारिक कामगारांचे औपचारिकीकरण या विषयासंदर्भात ते आपापल्या कल्पना, धोरणे आणि उपाय सामायिक करतील.

या कार्यक्रमात जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, संयुक्त राष्ट्र (भारत) आणि आशिया विकास बँक यांसारख्या प्रमुख संस्था सहभागी होणार असून ते त्यांची अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन मांडतील.

या चर्चासत्रात अर्थ मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, नीती आयोग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय  यासह प्रमुख मंत्रालयांचा सहभाग असेल. भारतीय उद्योग महासंघ, भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ (फिक्की), असोचॅम  आणि नॅसकॉम सारखे उद्योग भागीदार देखील त्यांची मते आणि अंतर्दृष्टी सामायिक करतील. तांत्रिक चर्चासत्रात राज्ये/केंद्रशासित प्रदेश देखील सहभागी होणार आहेत.

 


S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2090756) Visitor Counter : 23


Read this release in: English , Urdu , Hindi