कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
जम्मू आणि काश्मीरसाठी ऐतिहासिक निर्णय : नवीन जम्मू रेल्वे विभागाच्या उद्घाटन कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे पायाभूत सुविधांसाठी परिवर्तनात्मक पाऊल असल्याचे सांगत केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले स्वागत
Posted On:
06 JAN 2025 6:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केल्यामुळे जम्मू-काश्मीर आणि भारतीय रेल्वेच्या इतिहासात आज एक नवीन अध्याय कोरला गेला. या ऐतिहासिक कार्यक्रमात, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); भूविज्ञान आणि पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभाग राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या प्रदेशात सुरू असलेल्या परिवर्तनीय रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रकाश टाकला आणि जम्मू आणि काश्मीरला जोडण्यात त्यांची भूमिका अधोरेखित केली. ते म्हणाले की यामुळे जम्मू काश्मीर राष्ट्रीय मुख्य प्रवाहात येईल आणि या सुविधा आर्थिक आणि सामाजिक प्रगती उत्प्रेरकाचे कार्य करतील.
या समारंभात बोलताना डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की , "या रेल्वे विभागाची स्थापना हा केवळ लॉजिस्टिक/ दळणवळणातील मैलाचा दगड नव्हे तर जम्मू आणि काश्मीरला भारताच्या आर्थिक विकासाच्या मार्गाशी जोडण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी आहे. "त्यांनी भूतकाळात या प्रदेशाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला अडथळा ठरणारी आव्हाने आणि विलंब याचा उल्लेख करत अलीकडील वर्षांमध्ये अभूतपूर्व प्रगती कशी झाली हे नमूद केले.
नवीन जम्मू रेल्वे विभाग एक महत्त्वपूर्ण जंक्शन म्हणून काम करेल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत जलद प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ करेल. या व्यतिरिक्त, डॉ. जितेंद्र सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या व्यापक विस्तारावर भर दिला, ज्यामध्ये वंदे भारत ट्रेन आणि लोकांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी धोरणात्मक दृष्ट्या स्थित थांबे यांचा समावेश आहे.
S.Kane/H.Kenekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2090667)
Visitor Counter : 24