कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणामधील न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य पदांसाठी मागवले अर्ज
Posted On:
06 JAN 2025 3:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 6 जानेवारी 2025
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण (सीएटी) मध्ये न्यायिक सदस्यांच्या 5 आणि प्रशासकीय सदस्यांच्या 4 रिक्त जागांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. यासाठी विभागाकडून दिनांक 05.12.2024 रोजी दोन रिक्त पदांची परिपत्रके जारी करण्यात आली. या पदासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 सायंकाळी 5.30 पर्यंत आहे.
या रिक्त पदांसाठी पात्रता अटी आणि विहित अर्जाचा तपशील या विभागाच्या संकेतस्थळावर (www.dopt.nic.in) आणि केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या संकेतस्थळावर (www.cgat.gov.in) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उमेदवारांनी आपले अर्ज कृपया स्पीड पोस्टने पाठवावेत किंवा प्रत्यक्ष येवून सीआर विभाग, डीओपीटी, 5, नॉर्थ ब्लॉक, गेट क्रमांक 5 जवळ सादर करावेत.निर्धारित तारीख आणि वेळेपूर्वी या विभागापर्यंत अर्ज पोहोचविण्यात यावेत. सेवेमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या संवर्ग नियंत्रण प्राधिकरणामार्फत अर्ज करावा. तर निवृत्त अधिकारी त्यांचे अर्ज थेट पाठवू शकतात.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2090563)
Visitor Counter : 27