पोलाद मंत्रालय
केंद्रीय पोलाद व अवजड उद्योग मंत्री यांच्या हस्ते उद्या ‘पीएलआय योजना 1.1’चा शुभारंभ
सोबत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करणार
Posted On:
05 JAN 2025 12:39PM by PIB Mumbai
केंद्रीय पोलाद व अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी उद्या, 6 जानेवारी 2025 रोजी पोलाद उद्योगासाठी ‘पीएलआय योजना 1.1’ चा शुभारंभ करतील तसेच यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करतील.
नवी दिल्लीत मेट्रो भवन, मौलाना आझाद रोड येथील विज्ञान भवनमध्ये सभागृह क्रमांक 1 मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.
देशांतर्गत आणि परदेशातील सर्व कंपन्यांना भारतात उत्पादन निर्मीतीसाठी आकर्षित करण्याची योजना -
प्रॉडक्शन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना ही संकल्पना 2020 च्या जागतिक टाळेबंदीच्या दरम्यान उदयास आली. यामध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. सुरुवातीला तीन क्षेत्रांसाठी सुरू करण्यात आलेली `पीएलआय` योजना पुढे नोव्हेंबर 2020 मध्ये पोलाद क्षेत्राचा समावेश करून विस्तारित करण्यात आली.
पोलाद मंत्रालयाच्या `पीएलआय` योजनेने ₹27,106 कोटींच्या गुंतवणुकीची वचनबद्धता, 14,760 लोकांना थेट रोजगार आणि योजनेत नमूद केलेल्या अंदाजे 7.90 दशलक्ष टन ‘वैशिष्ट्यपूर्ण पोलाद’ (स्पेशालिटी स्टील)च्या उत्पादनाला चालना दिली आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत कंपन्यांनी ₹18,300 कोटींची गुंतवणूक केली असून 8,660 हून अधिक रोजगार निर्माण केले आहेत.
पोलाद मंत्रालयाने सहभागी कंपन्यांसोबत नियमित संवाद साधत या योजनेविषयी अभिप्राय घेतला आहे, त्यानुसार या योजनेमध्ये अधिक सहभाग आकर्षित करण्यासाठी योजना पुन्हा अधिसूचित करण्याची आवश्यकता नमुद करण्यात आली आहे.
***
S.Pophale/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2090302)
Visitor Counter : 49