संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमएनएस विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीत संपन्न

Posted On: 04 JAN 2025 3:55PM by PIB Mumbai

 

लष्करी नर्सिंग सेवा (MNS) विभागाच्या 18 व्या ब्रिगेडची कार्यअभ्यास परिषद नवी दिल्लीतल्या लष्करी रुग्णालयाच्या संशोधन व संदर्भ विभागात ऍडजुटंट जनरल  आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालकांच्या - DGMS (Army) अध्यक्षतेखाली 3 आणि 4 जानेवारी 2025 रोजी पार पडली. ‘क्षमता बांधणी व नर्सिंग क्षेत्रातील क्षमता’ ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. Addl DGMNS मेजर जनरल इग्नेटीयस डेलॉस फ्लोरा या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या. या परिषदेत एमएनएस अधिकाऱ्यांशी संबंधित मुद्दे आणि प्रशासकीय आव्हानांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

2025-26 या वर्षातील लष्करी नर्सिंग सेवा विभागाच्या आगामी शताब्दी समारंभानिमित्त DGMS (Army) आणि सिनियर कर्नल लेफ्टनंट जनरल साधना एस. नायर यांच्या हस्ते बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्रकाशित करण्यात आले. 'Honouring the past, Healing the present & inspiring the Future' अर्थात ‘भूतकाळाचा सन्मान, वर्तमानात सुधारणा आणि भविष्याची प्रेरणा’ हे या शताब्दी समारंभाचे घोषवाक्य आहे.

दर्जेदार सर्वसमावेशक रुग्णसेवा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या प्रभावित करणाऱ्या नर्सिंग संबंधातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी 2006 सालापासून दरवर्षी ही परिषद आयोजित केली जाते. जागतिकीकरण आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढत्या गुंतागुंतीमुळे एमएनएस अधिकाऱ्यांना आरोग्यसेवांच्या गरजांनुसार नर्सिंग क्षमता अद्ययावत ठेवणे, प्रशिक्षण व प्रशासन यामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

***

M.Pange/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090197) Visitor Counter : 23


Read this release in: English , Urdu , Hindi