वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय स्टार्टअप्सची वाढ आणि जागतिक पातळीवर त्यांच्या विस्ताराला गती देण्यासाठी DPIIT ची स्ट्राईड व्हेंचरशी भागीदारी

Posted On: 04 JAN 2025 1:25PM by PIB Mumbai

 

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधिक गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचा अधिक ठसा उमटावा, यासाठी स्ट्राइड व्हेंचर्स या उद्यम कर्ज क्षेत्रातील आघाडीच्या फर्मसोबत भागीदारी केली आहे.

आर्थिक सहाय्याला धोरणात्मक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्धतेची जोड देऊन स्टार्ट-अप्सना मोठ्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे सहकार्य महत्त्वाचे साधन ठरेल.

या सहकार्यामुळे होणारा ढोबळ-आर्थिक परिणाम स्पष्ट करताना, या प्रयत्नामुळे भारताची व्यापक आर्थिक उद्दीष्टे निश्चितच अधिक बळकट होतील आणि एकंदरितच आर्थिक वाढ साध्य करण्याची पहिली पायरी म्हणून नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल, असे स्टार्टअप इंडियाचे सह सचिव संजीव म्हणाले

अंतिमतः, हा प्रयत्न उत्पादन, ग्राहक, B2B आणि क्लीनटेक यासारखी क्षेत्रे केंद्रस्थानी असलेल्या भारत सरकारच्या मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड धोरणाशी जुळणारा ठरेल. या भागीदारीनंतर, स्ट्राइड व्हेंचर्स या अनुषंगाने खास कार्यक्रम तयार करणार असून उद्योजकता, नाविन्य आणि गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासाठीच्या भारत ग्रँड चॅलेंज सारख्या उपक्रमांसाठी सहकार्य करेल, असे संजीव यांनी सांगितले.

दरम्यान, स्ट्राइड व्हेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार इशप्रीत सिंग गांधी यांनी यासंबंधी आपल्या कंपनीच्या दृष्टीकोनाची रुपरेषा सादर केली, ते म्हणाले, "DPIIT सोबतच्या सहकार्यामुळे उद्योजकांना 'मेक इन इंडिया'साठी सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाला नवीन गती मिळणार असून प्रभावी, जागतिक स्तरावर ज्याचे पडसाद उमटू शकतील असे उपाय शोधता येऊ शकतील. या भागीदारीला, स्टार्टअप्सच्या वाढीकरिता अब्जावधी डॉलर्सच्या वचनबद्धतेची जोड, भारताची स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्याचे आमचे उद्दीष्ट ठळकपणे दाखवून देते. आम्ही एकत्रितपणे, प्रचंड क्षमता खुल्या करून जागतिक स्तरावर त्याचे परिवर्तनात्मतक परिणाम दाखवून देऊ, असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, स्ट्राइड व्हेंचर्स वाढीची क्षमता असलेले स्टार्टअप्स हेरून, जागतिक पातळीवरील आणि भारतात पदार्पण करत असलेल्या जागतिक स्टार्टअप्सचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारतीय स्टार्टअप्सना निधी, बाजारपेठेत प्रवेश आणि धोरणात्मक सहाय्य पुरविण्यावर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमधील स्टार्टअप्सच्या विस्तारासाठी त्यांना पाठिंबा देण्यास प्राधान्य देऊन मार्गदर्शन, सल्ला आणि जागतिक मार्गदर्शक नेटवर्क उपलब्ध करून देण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, उद्यम कर्जासह निधी उभारणीच्या विविध साधनांबद्दल त्यांना सजग करेल, जेणेकरून स्टार्ट-अप्सच्या वाढीच्या आकांक्षांना खतपाणी मिळेल.

***

M.Pange/M.Ganoo/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2090140) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil