संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयएनएस सर्वेक्षक पोर्ट लुईस येथे दाखल

Posted On: 27 DEC 2024 7:37PM by PIB Mumbai

 

संयुक्त जल सर्वेक्षण करण्यासाठी आयएनएस सर्वेक्षक मॉरिशसमधल्या पोर्ट लुईस येथे 26 डिसेंबर 24 रोजी दाखल झाले. जहाजाचे आगमन झाल्यावर, मॉरिशसमधील भारताचे उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, कॅप्टन सीजी बिनूप, कमांडंट, मॉरिशस नॅशनल कोस्टगार्ड आणि इतर लष्करी आणि नागरी मान्यवरांनी जहाजाचे स्वागत केले. मॉरिशसच्या जल सर्वेक्षण युनिटसोबत प्राथमिक सर्वेक्षण समन्वय बैठक झाली.

आयएनएस सर्वेक्षक मॉरिशसच्या अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक ज्ञानाचे आदानप्रदान करेल, व्यावसायिक संवाद आणि जलसर्वेक्षणावरील प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करेल. हे महत्त्वपूर्ण सर्वेक्षण मॉरिशसला सागरी पायाभूत सुविधा, संसाधन व्यवस्थापन आणि किनारपट्टी विकास नियोजन विकसित करण्यास सक्षम करेल. या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील मजबूत सागरी भागीदारी अधोरेखित झाली आहे, जी प्रादेशिक विकासासाठी सामायिक वचनबद्धता आणि भारत सरकारच्या सागर  (SAGAR हिंद महासागर संलग्न प्रदेशातील  सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ) दृष्टिकोनानुसार सखोल द्विपक्षीय सहकार्य प्रतिबिंबित करते.

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2088507) Visitor Counter : 30


Read this release in: English , Urdu , Hindi