गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्मार्ट शहरे मोहिमेवर प्रभाव मूल्यांकन अध्ययन


भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरूच्या अभ्यासात स्मार्ट क्लासरूम्सच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाल्याचा निष्कर्ष

Posted On: 27 DEC 2024 5:12PM by PIB Mumbai

 

  • 71 स्मार्ट शहरांनी 2,398 शहरांमध्ये 9,433 स्मार्ट क्लासरूम्स (वर्गखोल्या) विकसित केल्या - आयआयएम बंगळुरूचा अहवाल
  • सार्वजनिक वाचन अवकाश संस्कृतीचे पुनरुज्जीवन : श्रीनगर ते चेन्नई, औरंगाबाद ते आयझॉलपर्यंत विविध ठिकाणी स्मार्ट शहरे मोहिमेत सार्वजनिक शिक्षण सुविधा अद्ययावत
  • भारतीय स्मार्ट शहरे मोहिमेने सार्वजनिक शिक्षणातील दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला- आयआयएम बंगळुरू प्रभाव मूल्यांकन अध्ययन
  • संनिरीक्षण उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर नागपूरमध्ये एकूण गुन्ह्यांच्या दरात 14% घट-  आयआयएम बंगळुरू
  • स्मार्ट लाइटिंग आणि पॅनिक बटणमुळे शहरी क्षेत्रात महिलांची सुरक्षा वाढली असून गुन्ह्यांमध्ये घट होत आहे-  आयआयएम बंगळुरूच्या अभ्यासात नमूद

भारतीय व्यवस्थापन संस्था बंगळुरूने स्मार्ट शहरे मोहिमेच्या समीक्षा शृंखलेअंतर्गत दोन अध्ययने हाती घेतली. या अध्ययनात, स्मार्ट क्लासरूम्सच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे आणि भारतीय स्मार्ट शहरांमध्ये गुन्ह्यांच्या घटनेत रिअल टाइम ट्रॅकिंग ठेवले जात असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

या दोन अभ्यासात पुढील बाबींचा समावेश होता :

भारतीय स्मार्ट शहरांमध्ये स्मार्ट क्लासरूमद्वारे शिक्षणाच्या गुणवत्तेच्या दिशेने सुधारणा झाली आहे का?

नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू झालेल्या, सार (स्मार्ट शहरे आणि कृती व संशोधनाच्या दिशेने शिक्षण क्षेत्र) - स्मार्ट शहरे मोहिमेच्या समीक्षा शृंखलेअंतर्गत देशाच्या 29 प्रमुख संस्थांद्वारे विविध विषयांवर भारतीय स्मार्ट शहरांवर 50 राष्ट्रीय स्तरावरील  प्रभाव मूल्यांकन अध्ययन केले गेले. या शृंखलेत बंगळुरूच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेनेभारतीय स्मार्ट शहरांमध्ये मुलांसाठी, विशेषत: गरीब मुलांसाठी, स्मार्ट क्लासरूम्सच्या माध्यमातून  शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा झाली आहे का, जसे की गळतीचे प्रमाण कमी होणे, याविषयीचे अध्ययन हाती घेतले होते.

राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की 71 शहरांनी 2,398 सरकारी शाळांमध्ये 9,433 स्मार्ट क्लासरूम विकसित केल्या आहेत. वर्ष 2015-16 ते 2023-24 या कालावधीत 19 शहरांनी नोंदवलेल्या डेटानुसार स्मार्ट शहरे मोहिमेद्वारे स्मार्ट क्लासरूम सुरू केल्यामुळे एकूण नोंदणीत 22% वाढ झाली आहे.

हा अहवाल पुढील वेबलिंकवरून डाउनलोड करता येईल https://www.iimb.ac.in/node/13672

भारतातील स्मार्ट शहरांमध्ये गुन्हेगारी विशेषतः महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांच्या वास्तव-वेळी ट्रॅकिंगचा प्रभाव कसा आहे?

एसएएआर स्मार्ट शहरे मिशन समीक्षा मालिका – एससीएम अंतर्गत नोव्हेंबर 2023 मध्ये भारतातील स्मार्ट शहरांमध्ये विविध योजनांमार्फत 29 प्रमुख संस्थांद्वारे 50 राष्ट्रीय स्तरावरीलल प्रभाव मूल्यांकन अभ्यासांची सुरुवात करण्यात आली. या मालिकेत ‘भारतातील स्मार्ट शहरांमध्ये गुन्हेगारी विशेषतः महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या घटनांच्या वास्तव-वेळी ट्रॅकिंगचा प्रभाव कसा आहे?’ या विषयावरील अभ्यास आयआयएम बंगळुरूने हाती घेतला. या अभ्यासात घटनांच्या वास्तव-वेळी ट्रॅकिंगसह शहरातील महिला आणि मुलींची सुरक्षा आणि नजर ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना, सीसीटिव्ही कॅमेरे, आयओटी-चलित उपकरणे आणि त्यांचे एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्रां- (आयसीसीसीज्) -सह एकात्मिकरण यांच्या प्रभावाच्या मूल्यांकनाचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासात चेन्नई (तमिळ नाडू), नागपूर (महाराष्ट्र) आणि तुमकुरू (कर्नाटक) या स्मार्ट शहरांवर सखोल प्राथमिक प्रभाव मूल्यांकनासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अहवालात समोर आलेल्या इतर ठळक बाबी पुढीलप्रमाणे –

i. 93 स्मार्ट शहरांमध्ये 59,802 पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेरे आणि आणिबाणीच्या प्रसंगी वापरासाठी कॉल बॉक्स बसविण्यात आले आहेत. आयसीसीसीज् मार्फत वास्तव-वेळी नियमन यंत्रणेमुळे शहरी भागात महिलांची सुरक्षा वाढविण्यास हातभार लागला आहे. देखरेख  यंत्रणांना पोलिसांच्या व्यवस्थेशी जोडून घेतल्यामुळे देशात पुरावा-आधारित पाळत ठेवणे शक्य झाले आहे.

ii. नागपूरमध्ये देखरेखीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीनंतर एकंदर गुन्हेगारीच्या प्रमाणात 14% घट नोंदविण्यात आली.

iii. स्मार्ट पाळत व्यवस्थांवरील अंमलबजावणी काटेकोर आहे अशा भागात छळ, हल्ला आणि इतर गुन्ह्यांचे प्रसंग कमी झाले आहेत. या तीन शहरांमधील महिलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचा विश्वास वाढल्याचे सांगितले.

हा अहवाल  https://www.iimb.ac.in/node/13673 या वेबलिंकवर उपलब्ध आहे.

स्मार्ट शहरे मिशन’ विषयी थोडक्यात –

स्मार्ट शहरे मिशन’ (एससीएम) गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकारने 25 जून 2015 रोजी सुरू केले. पायाभूत सुविधा असलेल्या शहरांना प्रोत्साहन देणे आणि अशा शहरवासियांना जगण्याला चांगला दर्जा मिळवून देणे, स्वच्छ व शाश्वत पर्यावरण आणि ‘स्मार्ट’ उपाययोजना लागू करण्याच्या उद्देशाने या मिशनची सुरुवात झाली. एससीएम अंतर्गत अनेक परिवर्तनकारी आणि नवोन्मेषी प्रकल्प प्रत्यक्षात राबवविले जात असून हे मिशन आधुनिक भारतातील सर्वात बलशाली नागरी प्रयोग ठरले आहे.

***

N.Chitale/S.Kakade/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2088503) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi