विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी क्वांटमसाठी पदवीपूर्व अभ्यासक्रम केला जाहीर
Posted On:
25 DEC 2024 7:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी भारतातील राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत क्वांटम-प्रशिक्षित प्रणाली निर्माण करण्यासाठी एक विशेष पदवीपूर्व अभ्यासक्रम जाहीर केला आहे.
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की हा अभ्यासक्रम सैद्धांतिक ज्ञान आणि प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष अनुभव यांचे एकत्रीकरण करेल. पदवीधर विद्यार्थ्यांचा क्वांटम तंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. राष्ट्रीय क्वांटम मोहिमेमध्ये झालेल्या प्रगतीवर भर देत प्रा. सूद यांनी सांगितले की भारतासाठी तांत्रिक प्रगती आणि जागतिक नेतृत्वासाठी क्वांटम-कुशल मनुष्यबळ तयार करणे,या मोहिमेच्या उद्दिष्टांशी हा उपक्रम सुसंगत आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. अभय करंदीकर म्हणाले की या अभ्यासक्रमाची घोषणा भारतात क्वांटम-कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. "हा अभ्यासक्रम पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना तिसऱ्या किंवा चौथ्या सत्रापासून क्वांटम तंत्रज्ञानात लघु अभ्यासक्रम करण्याची संधी मिळेल," असेही त्यांनी सांगितले.

अभ्यासक्रमाच्या संरचनेत क्वांटम तंत्रज्ञानाच्या चार क्षेत्रांचा समावेश आहे – क्वांटम संगणन, क्वांटम संप्रेषण, क्वांटम सेन्सिंग आणि मेट्रोलॉजी, तसेच क्वांटम साहित्य आणि उपकरणे ही ती चार क्षेत्रे आहेत. प्रस्तावित अभ्यासक्रमासाठी किमान 18 गुण (क्रेडिट्स) आवश्यक आहेत, ज्यामध्ये सैद्धांतिक आणि प्रयोगशाळेचे अभ्यासक्रम आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाला 3 गुण (क्रेडिट्स) मिळतील (1 क्रेडिट म्हणजे आठवड्यात 1 तास वर्गाचा संपर्क किंवा 3 तासांचे प्रात्यक्षिकांचे सत्र). त्यामुळे हा लघु अभ्यासक्रम किमान 6 अभ्यासक्रमांचा समावेश करणारा असेल.
* * *
M.Pange/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2087915)