कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मोदी सरकारच्या प्रशासन सुधारणांमध्ये सुमारे 2,000 कालबाह्य नियम रद्दबातल केल्याचा समावेश -सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 24 DEC 2024 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024


मोदी सरकारच्या प्रशासन सुधारणांमध्ये जवळजवळ 2,000 कालबाह्य नियम रद्दबातल केल्याचा समावेश आहे. हे सर्व नियम काळाच्या ओघात प्रासंगिकता गमावत होते आणि प्रत्यक्षात कामाच्या सुलभतेसाठी आणि खटले वेळेवर निकाली काढण्यासाठी मारक ठरत होते असे , केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात एका विशेष संभाषणादरम्यान सांगितले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला, डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या प्रमुख कामगिरीचा आणि प्रशासन सुधारणांचा आराखडा मांडला.

पारदर्शकता, नवोन्मेष आणि लोककेंद्रित धोरणांबद्दल सरकारच्या वचनबद्धतेवर डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांना संबोधित करताना भर दिला. या धोरणाने भारतातील प्रशासनाचा अर्थ पुन्हा परिभाषित केला आहे.

कालबाह्य कायदे दूर करण्यासाठी सरकारने केलेल्या एकत्रित प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "प्रशासन सुलभ  करण्यासाठी आणि ते अधिक नागरिक-अनुकूल करण्यासाठी जवळजवळ 2000 कालबाह्य  नियम आणि कायदे रद्द करण्यात आले आहेत."


N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2087750) Visitor Counter : 20


Read this release in: English , Urdu , Hindi