भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सुशासन विषयावरील कार्यशाळेला केले संबोधित

Posted On: 23 DEC 2024 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024

सुशासन पद्धतींवरील राष्ट्रीय कार्यशाळेमध्‍ये मार्गदर्शन करताना, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); डॉ.जितेंद्र सिंह  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला आकार देणाऱ्या परिवर्तनात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकला.

सुशासन सप्ताहाचे उद्घाटन करताना, डॉ. जितेंद्र सिंह  यांनी या सुधारणांचा प्रमुख चालक म्हणून “संपूर्ण-सरकारच्या” दृष्टिकोनाची प्रशंसा केली.दिवंगत  पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त 19 ते 25 डिसेंबर दरम्यान चालणारा हा आठवडा  म्हणजे त्यांच्या सुशासनाचा वारसा पुढे चालविण्‍यासारखे आहे, असेही डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रशासकीय कार्यक्षमता आणि समाजकल्याण अशा दोन्‍ही गोष्‍टींमध्ये प्रगती करणाऱ्या सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील सहयोगी प्रयत्नांची प्रशंसा केली."संपूर्ण-सरकारच्या दृष्टिकोनाने कार्यक्षम, सर्वसमावेशक आणि प्रभावशाली असलेल्या शासन सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्यपूर्ण प्रयत्न केले आहेत," त्यांनी टिप्पणी केली. त्यांच्या भाषणामध्‍ये  एक महत्त्वाचा पैलू कचरा व्यवस्थापनातील नवकल्पनांना आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्यावर केंद्रित असल्याचे स्पष्‍ट झाले. यातूनच  आर्थिक आणि पर्यावरणीय शाश्‍वतपणाचे मॉडेल विकसित झाले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले आणि हा एक ऐतिहासिक उपक्रम असल्याचे  म्हटले. या मोहिमेमुळे  प्रशासनाला आकार दिला आहे. सरकारी कार्यालयांमधील भंगार आणि वापरात नसलेल्‍या साहित्याची पद्धतशीर विल्हेवाट लावण्‍यात आली आणि याद्वारे अवघ्या चार वर्षांत 2,364 कोटी रूपयांहून अधिक उत्पन्न झाले. "शासन पद्धतीत  फाईल प्रवासाचा वेळ कमी करण्यापासून आणि कचऱ्यातून संपत्ती निर्माण करण्यापर्यंत तसेच  डिजिटलायझेशनला चालना देण्याची पध्‍दती विकसित झाली आहे," डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.

कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात उचलण्‍यात आलेल्या पावलांवर चर्चा करताना, मंत्र्यांनी घरगुती कचऱ्याचे इंधनात रूपांतर करणे आणि वापरलेल्या स्वयंपाकाच्या तेलाचा जैवइंधनामध्ये पुनर्वापर करणे, यासारख्या उपक्रमांकडे लक्ष वेधले. डेहराडूनमध्ये एक पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला, ज्यामध्‍ये हानिकारक पुनर्वापर पद्धती कमी केल्या आणि पुनर्वापराला प्रोत्साहन दिले.चक्राकार अर्थव्यवस्थेच्या दिशेने जागतिक चळवळीत भारताचे नेतृत्व अधोरेखित करताना, “प्रत्येक कचरा ही संपत्ती आहे,” यावर त्यांनी भर दिला.

भारताच्या आर्थिक महत्त्वाकांक्षेमध्ये कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता केंद्रस्थानी असल्याचे सांगून मंत्री म्हणाले, “पुढील औद्योगिक क्रांती पुनर्वापराद्वारे चालविली जाईल.

डॉ.जितेंद्र सिंह यांनी सुशासन पद्धती  तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे यामध्‍ये जिल्हे, पंचायती आणि स्थानिक समुदायांना सहभागी करून घेण्‍याच्‍या  महत्त्वावर भर दिला.

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2087466) Visitor Counter : 15


Read this release in: English , Urdu , Hindi