लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

संसदेची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार कायम राखणे ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे प्रतिपादन


संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शने अथवा धरणे आंदोलन करणे योग्य नाही : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

प्रविष्टि तिथि: 20 DEC 2024 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 डिसेंबर 2024

संसदेची प्रतिष्ठा आणि शिष्टाचार कायम राखणे ही सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.18 व्या लोकसभेचे तिसरे अधिवेशन (हिवाळी अधिवेशन) आज समाप्त होत असताना  संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर  “धरणे” आंदोलन अथवा निदर्शने करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.अशा नियमांचे उल्लंघन झाल्यावर, संसदेला आपली प्रतिष्ठा आणि शिष्टाचार राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार आहे,असेही ते म्हणाले. त्यांनी सर्व सदस्यांना कोणत्याही परिस्थितीत नियमांचे पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन केले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या काळात झाले.या अधिवेशनात वीस बैठका झाल्या. भारतीय संविधानाला स्वीकृती देण्यात आली,त्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाली. या गौरवशाली प्रवासावरील चर्चा 13 डिसेंबर 2024 रोजी सुरू झाली आणि 14 डिसेंबर 2024 रोजी संपली.

अधिवेशन काळात पाच सरकारी विधेयके मांडण्यात आली आणि चार विधेयके मंजूर झाली.शून्य प्रहरात  61 तारांकित प्रश्नांवर तोंडी उत्तरे देण्यात आली आणि सदस्यांनी एकूण 182 तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी उपस्थित केल्या. नियम 377 अंतर्गत एकूण 397 प्रकरणे घेण्यात आली.अधिवेशनादरम्यान सभागृहाची एकूण उत्पादकता 57.87 टक्के होती.

28 नोव्हेंबर 2024 रोजी दोन नवनियुक्त सदस्यांनी शपथ घेतली. अधिवेशनादरम्यान, 17 डिसेंबर 2024 रोजी  लोकसभेने आर्मेनियाच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन, यांच्या नेतृत्वाखालील आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाचे स्वागत केले.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2086632) आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , Urdu , हिन्दी