वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
पीएम गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपच्या 85व्या बैठकीत प्रमुख रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन
Posted On:
19 DEC 2024 3:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2024
नेटवर्क प्लॅनिंग ग्रुप (NPG) च्या 85 व्या बैठकीत, पाच प्रकल्पांचे (2 रेल्वे आणि 3 महामार्ग विकास प्रकल्प) मूल्यमापन करण्यात आले. हे प्रकल्प मल्टीमोडल पायाभूत सुविधांचा एकात्मिक विकास, आर्थिक आणि सामाजिक नोड्ससह शेवटच्या-मैलासोबत संपर्कव्यवस्था, इंटरमोडल कनेक्टिव्हिटी आणि परस्पर समन्वयाने केलेली प्रकल्प अंमलबजावणी या पीएम गतिशक्ती एनएमपीच्या तत्त्वांशी सुसंगत आहेत.हे प्रकल्प मालवाहतूक व्यवस्थापनशास्त्र कार्यक्षमतेला चालना देऊन, प्रवासाच्या वेळा कमी करून आणि ते सेवा देत असलेल्या प्रदेशांना भरीव सामाजिक-आर्थिक लाभ देऊन राष्ट्रीय विकासात मध्यवर्ती भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अखंड संपर्कव्यवस्थेचे फायदे प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचत असल्याचे सुनिश्चित करून भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय योगदान देतील अशी अपेक्षा आहे.मल्टीमोडल परिवहन प्रणाली मजबूत करून आणि पायाभूत सुविधांमधील गंभीर त्रुटी दूर करून, हे उपक्रम एकात्मिक आणि शाश्वत विकासासाठी सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहेत.
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (DPIIT) संयुक्त सचिव डॉ. सुरेंद्र अहिरवार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या प्रकल्पांचे मूल्यमापन आणि संभाव्य परिणामांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:
A. रेल्वे मंत्रालयाचे प्रकल्प (MoR)
दांगोआपोसी- जरोली तिसरा आणि चौथा मार्ग
झारखंड आणि ओदिशामध्ये विस्तार असलेल्या विद्यमान मार्गिकेला समांतर 85.88 किमी लांबीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गांची बांधणी करण्यासाठीचा डांगोआपोसी-जरोली प्रकल्प आहे.. खनिज-समृद्ध केओंझार प्रदेशातून औद्योगिक हब आणि पारादीप बंदरापर्यंत लोहखनिजाची वाहतूक करण्यात हे मार्ग महत्त्वाची भूमिका बजावतील, कोळसा, जिप्सम आणि खते यांसारख्या घटकांची मोठ्या प्रमाणात अखंड आणि कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करतील. हा प्रकल्प क्षमतेत वाढ करेल, व्यापार कार्यक्षमतेत सुधारणा करेल आणि लोहखनिजाच्या जलद वाहतुकीला पाठबळ देऊन, पूर्व आणि उत्तर भारतातील औद्योगिक वृद्धीमध्ये बहुमूल्य योगदान देईल.
बुरवाल - गोंडा कचेरी चौथा मार्ग
बुरवाल-गोंडा कचेरी प्रकल्पात 55.75 किमी चौथ्या रेल्वे मार्गाचा समावेश आहे. हा प्रकल्प विद्यमान दुहेरी मार्गांना पूरक आहे आणि चालू असलेल्या तिसऱ्या मार्गाचे काम आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थित, हा प्रकल्प बाराबंकी, बहराइच आणि गोंडा जिल्ह्यांमध्ये प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्हीमध्ये संपर्कव्यवस्था वाढणार आहे.
या वाढीव क्षमतेमुळे हे मार्ग कोळशासहित, सिमेंट, खते आणि पोलाद यांसह विविध मालाची प्रमुख प्रदेशांकडून ईशान्येकडच्या भागाकडे ने-आण करण्याची व्यवस्था अतिशय सुरळीत करून मालवाहतूक व्यवस्थापनच्या कार्यक्षमतेला आणि प्रादेशिक संपर्कव्यवस्थेला चालना मिळेल.
B. रेल्वे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH)
बाराबंकी-बहराईच
बाराबंकी-बहराइच प्रकल्प NH-927 मार्गिकेच्या 101.54 किमी लांबीच्या भागाचे सहा लेनच्या संरचनांसह 4-लेनच्या कॉन्फिगरेशनमध्ये अद्ययावतीकरण करण्यावर भर देतो. ही सुधारित संपर्कव्यवस्था लखनौ, श्रावस्ती विमानतळ, NH-27 आणि भारत-नेपाळ सीमा यांना जोडेल, व्यापार सुलभ करेल आणि उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील प्रवासाचा वेळ कमी करेल. हा प्रकल्प उद्योग, पर्यटन आणि व्यापारविषयक व्यवहारांना पाठबळ देऊन आर्थिक संधींची दालने खुली करेल.
कानपूर रिंग रोड-कबराई
कानपूर-कबराई महामार्ग प्रकल्प 118.8 किमी लांबीचा 4-लेन ग्रीनफिल्ड महामार्ग सहा-लेनच्या संरचनेसह विकसित करेल, हा मार्ग NH-35 वर कानपूर रिंगरोड कबराईला जोडेल. तो कानपूर, हमीरपूर आणि महोबा जिल्ह्यांमध्ये वापरसुलभता वाढवून, सात रेल्वे स्थानके आणि तीन विमानतळांचे मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेमध्ये एकात्मिकरण करेल.
हा प्रकल्प औद्योगिक विकास, पर्यटन आणि प्रादेशिक एकात्मतेला चालना देईल आणि उत्तर प्रदेशच्या आर्थिक विकासात लक्षणीय योगदान देईल.
सिंघना- टिटनवार
सिंघना-टिटनवार प्रकल्पात राजस्थानमधील NH-311 च्या लगत 40.725 किमी 4-लेन नियंत्रित- प्रवेशसुलभता ग्रीनफील्ड महामार्ग प्रस्तावित आहे. सध्याच्या एकेरी-ते-मध्यम लेन प्रकारच्या रस्त्यांच्या आव्हानांवर उपाययोजना करून हा प्रकल्प सीकर, नागौर, जोधपूर आणि दिल्लीमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीत सुधारणा करेल. या प्रकल्पामुळे मालवाहतूक व्यवस्थापन, प्रादेशिक व्यापाराला चालना मिळेल आणि राजस्थान, हरयाणा आणि दिल्ली आणि लगतच्या भागातील आर्थिक विकासाला पाठबळ मिळेल.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085988)
Visitor Counter : 15