श्रम आणि रोजगार मंत्रालय
ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचाऱ्यांची ईएसआय (ESI) योजनेंतर्गत नोंदणी
नव्याने नोंदणी झालेल्यांमध्ये 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील 8.50 लाख युवा कर्मचाऱ्यांचा समावेश
3.52 लाख महिला कर्मचाऱ्यांनी ईएसआय (ESI) योजनेमध्ये केली नोंदणी
ऑक्टोबर 2024 मध्ये ईएसआय योजनेंतर्गत 21,588 नवीन आस्थापनांची नोंदणी
ऑक्टोबर 2024 मध्ये 42 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांची ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी
Posted On:
18 DEC 2024 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2024
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) तात्पुरत्या वेतनपट अहवालानुसार, ऑक्टोबर 2024 मध्ये 17.80 लाख नवीन कर्मचारी महामंडळाशी जोडले गेल्याचे दिसून आले आहे.
ऑक्टोबर, 2024 मध्ये 21,588 नवीन आस्थापना ईएसआयसी योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या. त्यामुळे अधिक कामगारांना सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले.
ऑक्टोबर 2023 च्या तुलनेत एकूण नोंदणीमध्ये 3% वृद्धी झाल्याचे वार्षिक विश्लेषण दर्शवत आहे.
Year on Year Comparison
|
Head
|
October 2023
|
October 2024
|
Growth
|
Number of New employees registered during the month
|
17.28 Lakh
|
17.80 Lakh
|
0.52 Lakh
|
आकडेवारीवरून असे लक्षात येते की, या महिन्यात महामंडळाशी जोडल्या गेलेल्या एकूण नोंदणीकृत 17.80 लाख कर्मचाऱ्यांपैकी 8.50 लाख, म्हणजेच सुमारे 47.75% कर्मचारी 25 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील आहेत.
त्याचप्रमाणे वेतनपट अहवालाचे लिंगनिहाय विश्लेषण असे सूचित करते की, ऑक्टोबर 2024 मध्ये महिला सदस्यांची एकूण नोंदणी 3.52 लाख इतकी होती. याशिवाय, ऑक्टोबर 2024 मध्ये एकूण 42 ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनी ईएसआय योजनेंतर्गत नोंदणी केली असून, यामधून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याप्रति असलेली ईएसआयसी ची वचनबद्धता स्पष्ट होते.
डेटा (विदा) निर्मिती ही निरंतर प्रक्रिया असल्यामुळे वेतनपट अहवाल तात्पुरता आहे.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085807)
Visitor Counter : 24