गृह मंत्रालय
छत्तीसगढ मधील डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रायपूर इथे झाली आढावा बैठक
मार्च 2026 पर्यंत डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सर्व सुरक्षा दलांनी तसेच संस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे अमित शाह यांचे निर्देश
मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्र सरकार वचनबद्ध आहे.
आपल्या सुरक्षा दलांनी गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांचे सर्वाधिक नुकसान केले आहे, हे एक मोठे यश आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत तिबेट सीमा दल, छत्तीसगढ पोलीस आणि जिल्हा राखीव रक्षक यांनी एक वर्षभरातच उत्तम कामगिरी करत ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवली असून मार्च 2026 पर्यंत आपण नक्षलवादाला मुळापासून उखडून टाकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजापूर येथील सुरक्षा दलांच्या गुंडम फॉरवर्ड ऑपरेटिंग तळाला भेट दिली आणि सैन्याच्या युद्ध सज्जतेचा(ऑपरेशनल परिस्थितीबद्दल) आढावा घेतला.
आपल्या जवानांनी 2024 मध्ये नक्षलवादाविरुद्ध मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्याच ऊर्जेने यापुढेही नक्षलवादाविरुद्धचा लढा सुरु ठेवण्यास
Posted On:
16 DEC 2024 10:58PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली छत्तीसगढमधील डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादासंदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रायपूर इथे आढावा बैठक झाली. या बैठकीला छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, उपमुख्यमंत्री विजय शर्मा, केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, छत्तीसगडचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPFs) महासंचालक उपस्थित होते.
मार्च 2026 पर्यंत डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने सर्व सुरक्षा दलांनी तसेच संस्थांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे निर्देश अमित शाह यांनी या बैठकीदरम्यान दिले.
छत्तीसगढ पोलीस आणि सुरक्षा दलांनी अत्यंत पद्धतशीरपणे आणि समन्वयाने कार्य करून नक्षलवादाविरुद्ध लढा दिला असे अमित शाह यांनी या बैठकीनंतर समारोप करताना सांगितले. आपल्या सुरक्षा दलांमुळे गेल्या वर्षभरात नक्षलवाद्यांचे सर्वाधिक नुकसान केले आहे, हे एक मोठे यश आहे, असे ते म्हणाले. तरीही मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्याला अजून बरेच काही करावे लागेल आणि या प्रयत्नांमध्ये राष्ट्रीय तपास संस्था, एन आय ए मोठी भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत तिबेट सीमा दल, छत्तीसगढ पोलीस आणि जिल्हा राखीव रक्षक यांनी एक वर्षभरातच उत्तम कामगिरी करत ध्येयाकडे वाटचाल सुरु ठेवली असून मार्च 2026 पर्यंत आपण नक्षलवादाला मुळापासून उखडून टाकण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजापूर येथील सुरक्षा दलांच्या गुंडम फॉरवर्ड ऑपरेटिंग तळाला भेट दिली आणि सैन्याच्या युद्ध सज्जतेचा(ऑपरेशनल परिस्थितीबद्दल) आढावा घेतला. आपल्या जवानांनी 2024 मध्ये नक्षलवादाविरुद्ध मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल अमित शाह यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्याच ऊर्जेने यापुढेही नक्षलवादाविरुद्धचा लढा सुरु ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.
***
JPS/BS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2085112)
Visitor Counter : 14