कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे हितधारकांबरोबर अर्थसंकल्प-पूर्व सल्लामसलत
प्राप्त सूचनांचा बारकाईने आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर अर्थमंत्र्यांना सादर केला जाईल: चौहान
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2024 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2024
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथील कृषी भवन येथे हितधारकांबरोबर अर्थसंकल्प-पूर्व सल्लामसलत केली. या बैठकीत शेतकऱ्यांसह कृषी उद्योजक, कृषी क्षेत्राशी संबंधित विविध संघटना, शेतकरी उत्पादक संघटना व इतर संबंधितांनी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या.

बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, प्राप्त झालेल्या सर्व सूचनांचा आम्ही बारकाईने आढावा घेऊ आणि त्यानंतर अर्थमंत्र्यांना सादर करू. आम्ही कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांशी सातत्याने संवाद साधत राहू असे चौहान म्हणाले.
बैठकीत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय देखील अंतर्गतरित्या बारकाईने अभ्यास करत आहे जेणेकरुन अर्थसंकल्पासंबंधीचे त्यांचे प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला लवकर दिले जातील. विविध जुन्या योजनांचाही आढावा घेण्यात येत असल्याचे चौहान यांनी सांगितले.

आज शेतकरी आणि इतर संघटनांनी तसेच विविध संबंधितांनी दिलेल्या सूचना महत्त्वाच्या आहेत कारण या लोकांना प्रत्यक्ष काम करताना अनुभव मिळतो, जो शेतीच्या फायद्यासाठी उपयुक्त ठरतो. कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धन, कृषी उत्पादनाच्या निर्यातदारांसाठी सुविधा वाढवणे, कृषी संशोधनाचा विस्तार करणे, शेतीसाठी लागणाऱ्या सामग्रीच्या किमती आणि दर्जावर नियंत्रण ठेवणे जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे इत्यादी अनेक सूचना या लोकांकडून प्राप्त झाल्या आहेत.

* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2085053)
आगंतुक पटल : 65