दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया भारतीय टपाल व दूरसंचार लेखा व वित्त सेवेच्या 50व्या स्थापना दिन समारंभात झाले सहभागी
Posted On:
14 DEC 2024 7:14PM by PIB Mumbai
भारतीय टपाल व दूरसंचार लेखा व वित्त सेवा (आयपी आणि टीएएफएस) चा 50व्या स्थापना दिन समारंभ आज नवी दिल्ली येथे पार पडला. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच केंद्रीय संचार व ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्यासह इतर अनेक मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी आधुनिक नागरी सेवकांनी तंत्रज्ञानस्नेही बनावे आणि पारंपरिक प्रशासकीय सीमांच्या पलीकडे जाऊन बदल घडवून आणावे असे आवाहन केले. आजच्या परस्पर जोडलेल्या जगात विविध विभागांदरम्यान समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लेखापरीक्षण प्रणाली स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. त्याच बरोबर महत्त्वपूर्ण निर्णयांसाठी मानवी देखरेख कायम ठेवण्याची सूचनाही केली .
केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या भाषणात तीन मुख्य आधारस्तंभांचा उल्लेख केला: दूरसंचार क्षेत्रात स्थिरता आणणे, पेन्शनधारकांचे सक्षमीकरण करणे आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेण्याची अधिकाऱ्यांची क्षमता . 5 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा झालेल्या दूरसंचार विभागाच्या संपन्न पेन्शन मॉडेलच्या यशस्वी अंमलबजावणीचे, तसेच डिजिटल भारत निधी (डीबीएन) च्या एकत्रीकरणाप्रति अधिकाऱ्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2084519)
Visitor Counter : 44