संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्रालयाने 12 सुखोई-30एमकेआय विमानांसाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडसह केला करार
Posted On:
12 DEC 2024 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 डिसेंबर 2024
सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला चालना देणारा करार संरक्षण मंत्रालयाने एम/एस हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) सह केला आहे. 12 सुखोई-30एमकेआय विमानांसह संबंधित उपकरणे मिळवण्यासाठी केलेल्या या करारांतर्गत कर आणि शुल्कांसह सुमारे 13,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून आज 12 डिसेंबर 2024 रोजी त्यावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
ही विमाने 62.6% देशी बनावटीची होणार असून भारतीय संरक्षण उद्योग क्षेत्र त्यातील भागांचे उत्पादन करणार आहे.
एचएएलच्या नाशिक विभागात या विमानांचे उत्पादन केले जाणार आहे. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमतेत भर पडणार असून देशाची संरक्षण सज्जता अधिक बळकट होणार आहे.
* * *
S.Patil/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2083995)
Visitor Counter : 49