इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते भारत इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे होणार उद्घाटन


आयआयजीएफ 2024 मध्ये डिजिटल दरी दूर करणे, जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता  आणि सुरक्षित- समावेशक डिजिटल भविष्यासाठी शाश्वत इंटरनेट यावर भर

Posted On: 08 DEC 2024 5:40PM by PIB Mumbai

 

भारत इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे (आयआयजीएफ) 2024 उद्या आणि परवा म्हणजे दि. 9 - 10 डिसेंबर 2024 आयोजन नवी दिल्‍लीतील प्रगती मैदानावरील  भारत मंडपम येथे करण्‍यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमइआयटीवाय) आणि नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (एनआयएक्सआय) यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित केली आहे. भारताच्या बहु-हितधारक समुदायाच्या पुढाकाराने आयोजित या फोरमचा उद्देश ‘इंटरनेट गव्हर्नन्स’च्या महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करणे, अर्थपूर्ण संवाद साधणे आणि जागतिक डिजिटल क्षेत्रातील भारताचे नेतृत्व अधोरेखित करणे हा आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री  जितिन प्रसाद यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी एमइआयटवाय चे सचिव  एस. कृष्णन उपस्थित राहणार आहेत.

आयआयजीएफचे आयोजन वर्ष 2021, 2022, आणि 2023 मध्ये  दूरदृष्य संवाद प्रणाली आणि प्रत्यक्ष सहभाग अशा मिश्र  पद्धतीने  यशस्वीपणे करण्यात आले होते. या चौथ्या आवृत्तीचा विषय ‘ भारतासाठी इंटरनेट व्यवस्थापनात नवकल्पना’  (इनोव्हेटिंग इंटरनेट गव्हर्नन्स फॉर इंडिया) हा आहे. या विचारमंचावर डिजिटल दरी भरून काढणे, ऑनलाइन व्यवहारातील  विश्वास आणि सुरक्षितता वाढवणे, आणि राष्ट्र निर्माणासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे यावर भर दिला जाईल. सुरक्षित, समावेशक आणि नैतिकदृष्ट्या शासित इंटरनेटच्या गरजेवर देखील या मंचावर भर दिला जाईल.

आयआयजीएफ 2024 मध्‍ये  सुरक्षित, समावेशक, आणि शाश्वत डिजिटल परिसंस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.  या चर्चेत डिजिटल दरी दूर करण्यासाठी प्रवेश, समावेशन, आणि डिजिटल अधिकार यावर भर दिला जाईल. इंटरनेट  प्रशासन मजबूत करण्यासाठी संतुलित आणि  विकासाभिमुख धोरणे तयार करण्यासाठी कायदेशीर आणि नियामक चौकट तपासली जाईल. जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता या अन्य  महत्त्वाच्या विषयावरही चर्चा यावेळी होणार आहे. यामध्ये समाजाच्या विकासासाठी नैतिक आणि  प्रभावी पद्धतीने एआय चा उपयोग कसा करता येईल, यावर चर्चा होईल. या उपक्रमामध्ये भाग घेणे आणि कार्यक्रमासाठी नोंदणी करणे तसेच विषय पत्रिका पाहण्यासाठी इच्छुकांना पुढील लिंकचा वापर करता येईल.:https://indiaigf.in/agenda-2/

***

S.Bedekar/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2082185) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil