अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना
प्रविष्टि तिथि:
06 DEC 2024 6:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
केंद्रीय मंत्रिमंडळाने 31 मार्च 2021 रोजी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 10,900 कोटी रुपयांच्या तरतुदीने 2021-22 ते 2026-27 या कालावधीत राबवण्यात येणार असलेली उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना (PLISFPI) मंजूर केली. या योजनेअंतर्गत 171 अर्जदारांची नोंदणी झाली आहे.
स्थानिक उत्पादन क्षमतेत वाढ करून, मूल्यवर्धनात वाढ करून, कच्च्या मालाच्या स्थानिक उत्पादनाला चालना देऊन आणि रोजगार संधी निर्माण करून या योजनेने देशाच्या एकंदर विकासामध्ये लक्षणीय योगदान दिले आहे. या योजनेने मोठ्या कंपन्या, मिलेट आधारित उत्पादने,नवोन्मेषी आणि सेंद्रीय उत्पादने याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ देतानाच, भारतीय ब्रँडस जागतिक पातळीवर प्रस्थापित करायला मदत केली आहे.
या योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, 213 स्थानांवर 8,910 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेने 2.89 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Kakade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2081626)
आगंतुक पटल : 107