रसायन आणि खते मंत्रालय
रशिया युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या विपरीत भूराजकीय परिस्थितीचा परिणाम होऊ न देता सरकारने देशभरात खते रास्त दराने उपलब्ध करून दिली
Posted On:
03 DEC 2024 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
रशिया युक्रेन युद्धामुळे उद्भवलेल्या भूराजकीय परिस्थितीचा विपरीत परिणाम न होता देशभरात खते रास्त दराने उपलब्ध व्हावीत यासाठी सरकारने जिथे आवश्यक असेल तेथे पोषण मूल्याधारित अनुदान (NBS) खेरीज विशेष निधी उपलब्ध करून दिला असून खतांच्या किमती स्थिर राहाव्यात व बाजारभावात मोठा चढउतार होऊ नये यासाठी तजवीज केली आहे. सरकारने या आधी 2021-22 साली रब्बी हंगामात दोन वेळा, नंतर 2022 च्या खरीप हंगामात, 2022-23 च्या रब्बी हंगामात तसेच 2024 च्या खरीप व रब्बी हंगामात पोषणमूल्याधारित अनुदानाखेरीज अतिरिक्त निधी पुरवला होता.
याशिवाय, खत पुरवठादार देशांचे अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी भारत सरकारने मोठ्या प्रमाणात खते बनवणाऱ्या अनेक देशांमधील पुरवठादारांचे भारतीय खत कंपन्यांशी दीर्घ मुदतीचे करार घडवून आणले व खते तसेच त्यांच्या उत्पादनात आवश्यक असलेल्या इतर घटकांचा व कच्च्या मालाचा पुरवठा निश्चित केला.
केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी ही माहिती आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
S.Patil/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2080153)
Visitor Counter : 53