नौवहन मंत्रालय
महत्त्वाच्या बंदरांचा जहाज कार्यपूर्तीचा सरासरी वेळ
Posted On:
03 DEC 2024 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2024
देशातील महत्वाच्या बंदरांमधील जहाजाच्या कार्यपूर्तीचा सरासरी वेळ (टर्न अराउंड टाइम) 2013-14 मध्ये लागणाऱ्या 93.59 तासांवरून खाली येऊन 2023-24 मध्ये 48.06 तासांवर आला आहे. म्हणजेच या वेळात 48.65% बचत झाली आहे. हा टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. उदा. नवीन बर्थ (जहाज उभे करण्याची जागा ), टर्मिनल्स, पार्किंग प्लाझा बांधणे, सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्स चे यांत्रिकीकरण/आधुनिकीकरण करून त्यांना अधिक फायदेशीर बनवणे, डिजिटॅलिकरणमार्फत विविध प्रणालींना अधिक कार्यक्षम बनवणे, बंदरापासून दूर असलेल्या प्रदेशांशी दळणवळण सुधारण्यासाठी रेल्वे व रस्त्यांचे जाळे तयार करणे, इत्यादी.
प्रत्येक महत्वाच्या बंदराचा आर्थिक वर्ष 2023-24 मधील टर्न अराउंड टाइम दर्शवणारा तक्ता पुढे दिला आहे :
Ports
|
FY 2023-24
(in hours)
|
Deendayal Port
|
54.24
|
Mumbai Port
|
62.97
|
Jawaharlal Nehru Port
|
26
|
Mormugao Port
|
65.61
|
New Mangalore Port
|
40.44
|
Cochin Port
|
33.4
|
V.O. Chidambaranar Port
|
51.36
|
Chennai Port
|
44.92
|
Kamarajar Port
|
44.37
|
Visakhapatnam Port
|
65.86
|
Paradip Port
|
41.61
|
Syama Prasad Mookerjee Port
|
60.85
|
Overall
|
48.06
|
महत्वाच्या बंदरांमध्ये जहाजांना बर्थ चे वाटप करणे व जहाजांचा अनुक्रम ठरवणे यासाठी मंत्रालयाने जारी केलेल्या बर्थिंग धोरणाचा आधार घेतला जातो. महत्वाच्या बंदरांवरील पायाभूत सुविधांचा विकास व क्षमतावर्धन ही एक सतत सुरु राहणारी प्रक्रिया आहे. यात नवीन बर्थ व टर्मिनल्स बांधणे , सध्या उपलब्ध असलेल्या बर्थ व टर्मिनल्स चे यांत्रिकीकरण करणे, मोठ्या आकाराच्या जहाजांना आकर्षित करण्यासाठी ड्रेजिंग करून बंदराजवळच्या समुद्राची खोली वाढवणे, रस्ते व रेल्वेचे जाळे उभारणे, इत्यादी.
ही माहिती केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज राज्यसभेत एका लिखित उत्तरात दिली आहे.
S.Tupe/U.Raikar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2080133)
Visitor Counter : 50