उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 3 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुंबईला देणार भेट


महाराष्ट्रात मुंबई येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकपूर्ती स्थापना दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती राहणार उपस्थित

Posted On: 02 DEC 2024 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 डिसेंबर 2024

 

उपराष्ट्रपती  जगदीप धनखड 3 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार असून ते मुंबईला भेट देणार आहेत. 

या दौऱ्यात उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या (ICAR-CIRCOT) शतकपूर्ती स्थापना दिनाला आणि मुंबईतील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शताब्दी स्तंभाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane


(Release ID: 2079682) Visitor Counter : 40