अर्थ मंत्रालय
सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी कलम 92E मध्ये संदर्भित अहवाल सादर करण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे विवरण पत्र दाखल करण्याच्या देय तारखेला दिली मुदतवाढ
Posted On:
01 DEC 2024 8:25PM by PIB Mumbai
प्राप्तिकर कायदा, 1961 (अधिनियम) च्या 139(1) अन्वये कलम 92E मध्ये संदर्भित अहवाल सादर करण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे विवरण पत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेम्बर ही आहे. अर्थात मूल्यांकन वर्षात म्हणजे AY 2024-25 मध्ये 30.11.2024 ही मुदतवाढ देण्यापूर्वीची शेवटची तारीख आहे.
कलम 139 च्या उप-कलम (1) च्या स्पष्टीकरण 2 च्या कलम (एए) अंतर्गत समाविष्ट असणाऱ्यांसाठी मूळतः 30 नोव्हेंबर 2024 ही देय तारीख आता दि 30.11.2024 च्या सीबीडीटी परिपत्रक क्रमांक 18/2024 F.No.225/205/2024/ITA-II द्वारे 15 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. हे परिपत्रक www.incometaxindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.
***
S.Kane/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2079597)
Visitor Counter : 71