सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
उपेक्षित कारागिरांच्या दालनांद्वारे 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात (आयआयटीएफ)-2024 मध्ये सुमारे 5.85 कोटी रुपयांची विक्रमी विक्री
प्रविष्टि तिथि:
01 DEC 2024 11:05AM by PIB Mumbai
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या (M/o SJ&E) मदतीने आयोजित उपेक्षित कारागिरांनी उभारलेल्या स्टॉल्सना संपूर्ण कालावधीत अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आणि त्यांनी 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा (आयआयटीएफ)-2024 दरम्यान सुमारे 5.85 कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी 15.11.2024 रोजी भारत मंडपम येथे मंत्रालय पॅव्हेलियनचे उद्घाटन केले.
|
S. No.
|
Corporations of M/o SJ&E
(No. of Stalls)
|
Total Sale
|
|
1.
|
NSFDC (30)
|
15900000
|
|
2.
|
NBCFDC (30)
|
12500000
|
|
3.
|
NSKFDC (30)
|
19600000
|
|
4.
|
VIP reference (8)
|
10500000
|
|
Total
|
58500000
|
आसाम, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मणिपूर, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल अशा 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग नोंदवला.
प्रदर्शनात सादर करण्यात आलेल्या उत्पादनांमध्ये रेडीमेड कपडे, हस्तकला, ब्लॉक प्रिंटिंग, झरी सिल्क, चंदेरी साड्या, कृत्रिम दागिने, लेदर उत्पादने, भरतकाम, पादत्राणे, लोकर वस्त्रे, हस्तनिर्मित बॅग्स, वाळकी आणि बांबूची उत्पादने, लोणची, चटपटीत पदार्थ, उदबत्या आणि सुगंधी द्रव्य, राजस्थानी मोजडी, खेळणी इत्यादींचा समावेश होता.
***
S.Pophale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2079489)
आगंतुक पटल : 118