माहिती आणि प्रसारण मंत्रालय
कला चित्रपट कठीण आणि गुंतागुंतीचे असतात”: क्यूहवान जिओन, ‘लॉस्ट हॉर्स’ चे दिग्दर्शक
रॉड्रिगो क्विंटेरो अरौझ यांचा चित्रपट 'दे कॉल मी पॅन्झर' हा पनामानियन फुटबॉल दिग्गज रोमेल फर्नांडेझ गुटरेझ यांच्या जीवनापासून प्रेरित
हंगेरियन चित्रपट निर्माते बॅलिंट झिमलर यांचा चित्रपट 'लेसन लर्न्ड' म्हणजे दडपशाही शिक्षण व्यवस्थेवर केलेली टीका
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2024
दक्षिण कोरिया, हंगेरी आणि पनामा येथील तीन मनोवेधक चित्रपटांनी भारताच्या ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रसिकांना आनंद दिला. सिनेमा ऑफ द वर्ल्ड विभागात क्यूहवान जिओनचा दक्षिण कोरियायी चित्रपट लॉस्ट हॉर्स आणि रॉड्रिगो क्विंटेरो अरौझचा स्पॅनिश भाषेतील पनामेनियन चित्रपट दे कॉल मी पॅन्झर यांचा समावेश होता. बालिंट झिमलर दिग्दर्शित लेसन लर्न्ड हा हंगेरियन चित्रपट देखील आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकाच्या स्पर्धेत आहे. या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आज पत्रकार परिषदेत सहभाग नोंदवला.
लॉस्ट हॉर्स
जिओन क्यू-ह्वानचा चित्रपट किम या वृद्ध माणसाच्या संघर्षाचे चित्रण करतो, ज्याचे 20 प्रेमळ घोडे जेजू बेटावरील त्याच्या कुरणातून गूढपणे गायब झाले. बेकायदेशीर स्थलांतरित मांस विकण्यासाठी जंगलात चोरलेल्या पशुधनाची कत्तल करत आहेत हे कळल्यावर किमने या भागात छापा टाकण्यासाठी एक क्रॅकडाऊन पथक तयार केले.
जीओनने त्याच्या चित्रपटावर चर्चा करताना, कोरिअन सिनेमांना जागतिक लोकप्रियता असूनही अशा चित्रपटांना ओळख मिळवून देण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, स्वतंत्र चित्रपट तयार करण्याच्या आव्हानांचा खुलासा केला, त्यांनी आर्ट फिल्म्सची जटिलता विशद केली, परंतु त्याने त्यांचे उत्पादन सक्षम करण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मला श्रेय दिले. तो म्हणाला, “मला सहाय्यक निर्माते मिळाले आणि इफ्फी सारख्या महोत्सवात माझे चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे.”
दे कॉल मी पॅन्झर
पनामानियन चित्रपट निर्माते रॉड्रिगो क्विंटेरो अरौझ यांचा चित्रपट दिग्गज पनामानियन आणि टेनेरिफ फुटबॉलपटू रोमेल फर्नांडेझ गुटरेझ यांच्या जीवनापासून प्रेरणा घेतो, त्याची उत्कटता, चिकाटी आणि खेळाची परिवर्तनीय शक्ती प्रदर्शित करतो. रोमेलचे 1993 मध्ये 27 व्या वर्षी एका कार अपघातात दुःखद निधन झाले.
कौटुंबिक जबाबदाऱ्या संतुलित करण्याबाबचे रोमेलचे प्रयत्न चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचे रॉड्रिगो यांनी स्पष्ट केले. " पनामा सोडल्यावर रोमेल पॅन्झर बनला," दिग्दर्शकाने नमूद केले. रोमेलला वैयक्तिकरित्या ओळखणाऱ्या अनेकांनी चित्रपटासाठी योगदान दिले, ज्यात त्याची बहीण जॅकलीन होती, जिने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सामायिक केले. रोमेलने आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आपले कुटुंब सोडण्याचा निर्णय घेतला, हा चित्रपटाच्या टर्निंग पॉइंट असल्याचे रॉड्रिगो यांनी वर्णन केले. ते म्हणाले, "'स्वप्न आणि कौटुंबिक प्रेमावरील चित्रपट' असा त्याचा सारांश सांगता येईल.”
पनामामधील चित्रपट उद्योगाबद्दल बोलताना रॉड्रिगो म्हणाले की, त्यांच्या देशात दीर्घ कालावधीसाठी चित्रपट प्रदर्शित करणे कठीण आहे. त्यामुळे लोकांना तिथे चित्रपट पाहण्याची फारशी संधी मिळत नाही. ते पुढे म्हणाले, "4 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या देशात जेमतेम 100 चित्रपट निर्माते आहेत."
लेसन लर्न्ड
समाजाला आरसा दाखविणारे चित्रपट निर्माण करण्याचे हंगेरियन चित्रपट निर्माते बॅलिंट झिमलर यांचे उद्दिष्ट त्यांच्या ‘लेसन लर्नड’ या चित्रपटात प्रतिबिंबित होते. ही कथा कालबाह्य शालेय पद्धतींना आव्हान देणारा एक तरुण शिक्षक जुसी आणि हंगेरीच्या आव्हानात्मक शिक्षण व्यवस्थेशी जुळवून घेण्यासाठी धडपड करणारा नवोदित पाल्को यांची आहे. "त्यांच्या वैयक्तिक कथा दडपशाही व्यवस्थेबाबत ची त्याची अंतर्दृष्टी व्यक्त करतात, व्यापक हंगेरियन समाजाला प्रतिबिंबित करतात," बॅलिंट यांनी स्पष्ट केले.
बॅलिंट, जे स्वतः वयाच्या नवव्या वर्षी अमेरिकेमधून हंगेरीला गेले होते, तेव्हा नवीन शिक्षण पद्धतीशी जुळवून घेण्याच्या वैयक्तिक अनुभवांमधून त्यांनी यांचे रेखाटन केले. “शिक्षण व्यवस्था दुहेरी जाचक आहे. एक समाज म्हणून आम्हाला कठोर नियमांची सवय झाली आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या मुद्द्यांवर प्रकाश टाकणे मला भाग पडले, असे ते म्हणाले.
एकोणीस निर्मात्यांनी या चित्रपट प्रकल्पासाठी सहकार्य केले, पटकथा पूर्ण केली आणि अवघ्या पाच महिन्यांत चित्रीकरण करण्यात आले. लेसन लर्न्डचा 55 व्या इफ्फीमध्ये आशिया प्रीमियर झाला.
पत्रकार परिषद येथे पहा:
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Nandini/Darshana | IFFI 55
(Release ID: 2078545)
Visitor Counter : 13