सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
"भारतातील वेतनपट अहवाल: एक रोजगार दृष्टीकोन -सप्टेंबर, 2024"
Posted On:
25 NOV 2024 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीसाठी औपचारिक क्षेत्रातील रोजगाराशी संबंधित आकडेवारी जारी करत आहे. यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ ) योजना , कर्मचारी राज्य विमा (ईएसआय ) योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस ) या तीन प्रमुख योजनांतर्गत सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांच्या संख्येची माहिती वापरण्यात आली आहे.
संपूर्ण अहवाल इथे पाहता येईल : Payroll Reporting in India An Employment Perspective –September, 2024.pdf
1.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना:
सप्टेंबर 2024 मध्ये नवीन ईपीएफ सदस्यांची एकूण संख्या 9,47,068 आहे , जी ऑगस्ट 2024 मध्ये 9,78,275 होती. जुलै 2024 मध्ये सर्वाधिक 1,117,481 ईपीएफ सदस्य जोडले गेले.
2.कर्मचारी राज्य विमा योजना:
सप्टेंबर, 2024 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत नवीन नोंदणीकृत कर्मचारी आणि योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 15,02,964 आहे जी ऑगस्ट 2024 मध्ये 15,25,086 होती.
3.राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस ):
सप्टेंबर 2024 मध्ये , एनपीएस अंतर्गत नवीन योगदान देणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या 58,018 आहे जी ऑगस्ट 2024 महिन्यात 54,869 होती.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2076915)
Visitor Counter : 12