माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘मनोरंजन, शिक्षण आणि प्रगती (एंटरटेन-एज्युकेट-एलिव्हेट-3E): दृक्श्राव्य प्रसारण क्षेत्रात या तीन सिद्धांतांचे आम्ही अनुकरण करतो’ - विधु विनोद चोप्रा
'माझा दिग्दर्शकावर विश्वास नाही, माझा माणसावर विश्वास आहे': विधु विनोद चोप्रा
'विनोदला कुठे जायचे आहे हे माहित नाही - पण त्याला कुठे उभे राहायचे नाही हे त्याला निश्चितपणे माहीत आहे': शंतनू मोईत्रा
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2024
55 व्या इफ्फीच्या आजच्या तिसऱ्या दिवशी, श्री प्रख्यात संगीत दिग्दर्शक,शंतनू मोईत्रा, आणि समृद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक विधु विनोद चोप्रा,यांच्याशी कला अकादमी, पणजी, गोवा येथे वार्तालाप झाला आणि खचाखच भरलेल्या सभागृहात 'लिव्हिंग मूव्हीज: फिल्ममेकिंग आणि क्रिएटिव्ह लाइफ' हे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट सत्र संपन्न झाले.
श्री मोईत्रा यांनी या सत्राची सुरुवात त्यांच्या 'परिणीता' चित्रपटातील त्यांच्या सुप्रसिद्ध 'पियू बोले, पिया बोले' या गाण्याने केली आणि काही वेळातच श्री चोप्रा त्यांच्यासोबत सामील झाले.अशा मास्टरक्लास संभाषणांचा आरंभ प्रस्थापित आदर्श मोडत चोप्रा ताबडतोब त्यांच्या सोफ्यावरून खाली उतरून केलाआणि अत्यंत अनौपचारिक पद्धतीने उर्वरित सत्रात श्रोत्यांना त्यांच्या उर्जेने पूर्णपणे गुंतवून ठेवले.
आपल्या पूर्वायुष्यातील क्षणांचे स्मरण करत, श्री चोप्रा यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजय आनंद यांना मदत करण्याच्या स्वप्नाची आठवण सांगितली.
श्री चोप्रा यांनी एनएफडीसीच्या आर्थिक सहाय्याने बनवलेल्या ‘खामोश’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे विपणन करताना आणि एनएफडीसीच्या रकमेची परतफेड करताना उभ्या ठाकलेल्या आव्हानांना कसे तोंड द्यावे लागले हे सांगितले.NFDC धोरणानुसार, त्यांनाअयशस्वी झाल्यास, पुढील उपक्रमासाठी कोणतीही मदत मिळणार नव्हती.प्रख्यात दिग्दर्शक, वितरकांनी चोप्रा यांच्या चित्रपटाचे कौतुक तर केले, पण पुन्हा पुन्हा आनंदाची बातमी देत त्यांचा फोन वाजला नाही. शेवटी त्यांनाच चित्रपटाचे वितरक व्हावे लागले.
अशाच समान अनुभवातून गेल्यामुळे प्रश्न विचारताच, श्री मोईत्रा यांनी आठवण करून दिली: “‘परिणिता’ दरम्यान संगीत लोकप्रिय होईल का नाही याबद्दल शंका होती, विशेषत: चित्रपट उद्योगातील तत्कालीन प्रचलित कल लक्षात घेता,ते कठीण होते .पण विधू स्वतः ज्याला कधीही पत्र मिळाले नाही किंवा तो कॉल आला नव्हता, त्यानेच मला यश मिळो वा अपयश पुढील तीन VCF उपक्रमांसाठी करारबद्ध केले;आणि हीच विधू विनोद चोप्रा यांची व्याख्या आहे.”
श्री मोईत्रा यांनी कर्तव्यकठोर श्री चोप्रा किती शिस्तबद्ध आहेत यावर प्रकाश टाकला.‘विनोदला कुठे जायचे आहे हे माहित नाही – पण त्याला कुठे उभे राहायचे नाही हे त्याला नक्कीच माहीत आहे’,असा शेरा श्री चोप्रा यांचे व्यक्तिमत्त्व उलगडताना त्यांनी मारला.या गुणामुळे त्यांचे आणि श्री चोप्रा यांच्यासोबत काम करणाऱ्या इतरांचे जीवन कसे दुःखदायक बनते, हे हसत खेळत स्पष्ट सांण्याची संधी श्री मोईत्रा यांनी सोडली नाही.
नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रपट बनवताना व्यवसायाची शक्यता चाचपून पहाणे आवश्यक आहे की नाही या प्रश्नावर , श्री चोप्रा यांनी ठामपणे नकार दिला."मी फक्त असा चित्रपट बनवतो, ज्यावर माझा विश्वास आहे" आणि "एंटरटेन-एज्युकेट-एलिव्हेट: हे तीन E चे सिद्धांत आम्ही आमच्या दृकश्राव्य सादरीकरणातून (VCF) आचरणात आणतो," असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या दिग्दर्शकासोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल, बोलताना श्री. चोप्रा म्हणाले,"जेव्हा मी स्वतः चित्रपटाची निर्मिती करतो तेव्हा मी माझ्या दिग्दर्शकावर विश्वास ठेवत नाही, तर मी त्याच्या आतल्या माणसावर विश्वास ठेवतो."
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sampada/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076126)
Visitor Counter : 15