माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सबका मनोरंजन: 55 व्या इफ्फीमध्ये सुलभता अग्रस्थानी
एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी मनोरंजन उद्योगात सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार
#IFFIWood, 22 नोव्हेंबर 2024
55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने (इफ्फी ) सर्वांसाठी सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. "ॲक्सेसिबिलिटी ॲट इफ्फी" या विषयावरील पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव आणि एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार, गोव्याच्या राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा आय. हाझिक आणि स्वयंमच्या प्रमुख वंदना बूलचंद यांनी इफ्फीला समावेशकतेचे मॉडेल बनवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या परिवर्तनात्मक उपायांचा उल्लेख केला.
55 व्या इफ्फीच्या 'सबका मनोरंजन' या संकल्पनेअंतर्गत सर्वांसाठी एक उत्तम सिनेमॅटिक अनुभव सुनिश्चित करून, विशेष क्षमतेच्या दर्संशकांसाठी सांकेतिक भाषेत अर्थनिरूपण, सुलभ चित्रपट स्क्रीनिंग, अडथळा-मुक्त ठिकाणे, संवेदनशीलता-प्रशिक्षित कर्मचारी आणि मूव्ही बफ ॲप सारखी डिजिटल साधने यांसारखे समावेशक उपक्रम हाती घेण्यात आले.
प्रिथुल कुमार यांनी महोत्सवाच्या सर्वसमावेशक उपक्रमांबाबत विश्वास व्यक्त केला. “इफ्फीमध्ये सुलभतेच स्तर यावर्षी वाढला आहे. प्रशिक्षित स्वयंसेवक आणि संवेदनशील अधिकाऱ्यांपासून ते दिव्यांग व्यक्तींसाठी सहा चित्रपटांचा एक समर्पित विभाग आणि इतर 11 प्रवेशयोग्य चित्रपटांपर्यंत, आम्ही प्रवेश सुलभतेला केंद्रस्थानी ठेवले आहे,” असे ते म्हणाले. कुमार यांनी सिनेमाला अधिक समावेशक बनवण्यासाठी मनोरंजन उद्योगासाठी जारी केलेल्या सुलभ मार्गदर्शक तत्त्वांचा उल्लेख करून समावेशकतेप्रति मंत्रालयाची वचनबद्धता अधोरेखित केली. अशा सर्वसमावेशकतेसह कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी गोवा सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
ताहा आय. हाझीक यांनी सुलभता उपक्रमांमधील गोव्याच्या अग्रगण्य भूमिकेवर भर दिला. “इफ्फीने खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या मनोरंजनाच्या भावनेला मूर्त रूप दिले आहे. रॅम्प आणि लाईव्ह सांकेतिक भाषेपासून ते '12वी फेल' सारख्या सुगम्य चित्रपटांच्या प्रदर्शनापर्यंत, हा उत्सव प्रत्येकासाठी आहे याची आम्ही काळजी घेत आहोत " असे त्यांनी नमूद केले. हाझिक म्हणाले की निर्मिती संस्था आणि ओटीटी प्लॅटफॉर्म देखील सुलभता वैशिष्ट्यांचा अवलंब करण्यात प्रगती करत आहेत. इफ्फी 2024 दरम्यान सुलभ पायाभूत सुविधा, सुलभ ई-रिक्षा आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि प्रशिक्षित स्वयंसेवक आणि सहज वापर करण्यायोग्य वेबसाइट्सची प्रशंसा केली. सुलभतेचे एक आदर्श राज्य बनण्याच्या गोव्याच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
वंदना बूलचंद यांनी सुलभतेचे मूल्यमापन आणि प्रशिक्षण आयोजित करण्यात स्वयंमची भूमिका अधोरेखित केली. 55 व्या इफ्फीचा ॲक्सेसिबिलिटी पार्टनर म्हणून, महोत्सवाला सर्वसमावेशक बनवण्यासाठी स्वयंमने अनेक पैलूंवर काम केले आहे. स्वयमच्या पुढाकारांमध्ये एनएफडीसीच्या मीडिया टीमला सोशल मीडिया पोस्ट, वेबसाइट आणि इतर संवाद सामग्री कमी दृष्टी असलेल्यांसाठी अनुकूल बनवण्यासाठी प्रशिक्षण समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. स्वयंमने स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे जेणेकरुन महोत्सवात सहभागी होणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची काळजी घेता येईल.
बूलचंद यांनी उपस्थितांना टेक पॅव्हेलियनच्या सिम्युलेशन झोनचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले. इफ्फीमध्ये प्रथमच, टेक पॅव्हेलियनमध्ये स्वयंमचा सिम्युलेशन झोन उपस्थितांना दिव्यांग लोकांसमोरील आव्हानांचा अनुभव मिळवून देतो, सुलभतेची सखोल समज वाढवतो, सार्वजनिक ठिकाणी आणि परस्परसंवादांमध्ये अधिक समावेशक आणि सहानुभूतीपूर्ण डिझाईन्सना प्रेरणा देतो.
सर्वांसाठी सर्वसमावेशक सिनेमॅटिक अनुभव बनवण्याच्या हितधारकांच्या सामूहिक प्रयत्नांचा इफ्फी 2024 हा दाखला आहे.
अधिक माहितीसाठी वाचा: https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=2074789
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sushma/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076116)
Visitor Counter : 14