नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी विचार नेतृत्व मंच - सागरमंथन - उद्या दिल्लीत सुरू होणार

Posted On: 17 NOV 2024 1:54PM by PIB Mumbai

 

दक्षिण आशियातील सर्वात मोठा सागरी विचार नेतृत्व मंच, `सागरमंथन` उद्यापासून  दिल्लीत सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या सहयोगाने या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘सागरमंथन – महासागर संवाद (द ग्रेट ओशन्स डायलॉग)’ याच्या पहिल्या संस्करणाचा उद्देश सागरी क्षेत्राबाबत  ज्ञान वृद्धी करणे आणि जागतिक नेते, धोरण निर्माते, उद्योगातील अग्रणी, विचारवंत आणि द्रष्ट्यांसाठी एक प्रमुख जागतिक व्यासपीठ प्रदान करणे हा आहे. या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी एक शाश्वत, कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज सागरी क्षेत्र घडवण्यासाठी उपयुक्त निर्णय घेण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळेल.

यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “सागरमंथन हा  सागरी क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञांच्या सखोल ज्ञान, विद्वत्ता आणि भविष्यातील कल संदर्भात अंतर्दृष्टीसह सर्वोत्तम उपलब्ध ज्ञान साजरे करण्याचा एक प्रयत्न आहे. मानवजात एका संकटमय स्थितीत आहे आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे ही भविष्यातील पिढ्यांप्रती आपली नैतिक जबाबदारी आहे. सागरमंथन दोन दिवस चालणार आहे. यामध्ये गहन, प्रामाणिक आणि ध्येय - केंद्रित चर्चांद्वारे आपल्याला  भरभरून ज्ञान प्राप्त होईल. या माध्यमातून आपले उपक्रम अधिक चांगले परिणाम देण्यासाठी सज्ज करण्यात येतील आणि नील अर्थव्यवस्थेच्या क्षमतेचा वापर करण्यास आपल्याला प्रोत्साहन देतील. सागरमंथनाद्वारे समावेशक विकास, शाश्वत पद्धती आणि सशक्त समुदायांवरील महत्त्वपूर्ण चर्चेचे नेतृत्व करणे  हा यामागचा  उद्देश आहे. यामुळे एक समृद्ध आणि शाश्वत नील अर्थव्यवस्था घडवण्यासाठी सामायिक दृष्टी विकसित होईल.”

***

S.Kane/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2074076) Visitor Counter : 34