सांस्कृतिक मंत्रालय
संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने 5 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे केले आयोजन
Posted On:
10 NOV 2024 8:48PM by PIB Mumbai
संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने 5 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती. पहिल्या आशियाई बौद्ध शिखर परिषदेच्या उल्लेखनीय कामगिरींपैकी एक म्हणजे, दोन समांतर मंचाचे यशस्वी आयोजन, ज्यात दोन्ही मंचानी एक अंतर्दृष्टीपूर्ण दृष्टीकोन प्रदान केला. या मंचांच्या आयोजनामुळे विचारांच्या समृद्ध अभिसरणाची संधी मिळाली, त्यापैकी एका मंचाने बुद्धाच्या मूलभूत शिकवणींवर आणि त्यांच्या आधुनिक काळातील उपयोगांवर लक्ष केंद्रित केले, तर दुसऱ्या मंचाने बौद्ध तत्त्वे शाश्वत विकास, सामाजिक समरसता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यामध्ये योगदान देऊ शकतील अशा मार्गांचा शोध घेतला.
यावेळी अनेक सादरीकरणे करण्यात आली. ही सादरीकरणे, ज्यांचा तात्विक ज्ञानाचा उपयोग आणि समाजाच्या भल्यासाठी व्यावहारिक वापराचे साधन म्हणून वापर करता येईल असे असाधारण पर्याय, दृष्टीकोन आणि काही 'चौकटीच्या बाहेर'चे दृष्टीकोन प्रदान करणारी होती. यावेळी आयोजित चर्चासत्रे आणि परिषदा मुख्यतः धार्मिक पैलू आणि त्यावर आधारित व्याख्यानाशी संबंधित होते. या शिखर परिषदेत धम्माचे प्राचीन तत्त्वज्ञान आणि विज्ञानातून निर्माण झालेल्या अनेक अभिनव कल्पना मांडण्यात आल्या.
‘आशियाला बळकट करण्यात बौद्ध धम्माची भूमिका’ या संकल्पनेवर आधारित, प्रथम आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन, संस्कृती मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ द्वारे करण्यात आले होते. यात 160 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींसह 32 देशांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महासंघाचे सदस्य, विविध मठ परंपरांचे कुलगुरू, भिक्षू, साध्वी , राजनैतिक समुदायाचे सदस्य, बौद्ध अभ्यासाचे प्राध्यापक, तज्ञ आणि अभ्यासक अशा सुमारे 700 सहभागींनी उत्साहाने भाग घेतला.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2072244)
Visitor Counter : 41