पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नागरिक - केंद्रित सेवांविषयी माहिती पोहचवण्यासाठी उद्या विशेष वेबिनारचे आयोजन


या वेबिनारच्या माध्यातून ग्रामीण पातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न होणार :  पुरस्कार प्राप्त उपक्रमही प्रदर्शित केले जाणार

Posted On: 10 NOV 2024 11:32AM by PIB Mumbai

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या  राष्ट्रीय ई - गव्हर्नन्स वेबिनार मालिकेच्या 2023 – 24 (NeGW 2023 – 24) अंतर्गत उद्या 11 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12.00 ते 1.00 या वेळेत पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या जाणाऱ्या नागरिक - केंद्रित सेवांच्या विषयावर विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज हे  या वेबिनारचे सह -अध्यक्षपद  भूषणवणार आहेत. हे दोन्हीही मान्यवर या वेबिनारला उपस्थित असलेल्यांना संबोधित करतील, या वेबिनारच्या आयोजनाविषयी मार्गदर्शन करतील, तसेच ग्रामीण भागात वसलेल्या नागरिकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करण्यामध्ये  पुरविण्यात पंचायती राज संस्थांची भूमिका किती महत्वाची असते ही बाबही आपल्या संबोधनातून अधोरेखीत करतील. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव पुनीत यादव, पंचायती राज मंत्रालयाचे सहसचिव आलोक प्रेम नागर हे देखील या वेबीनारला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंचायतींमधील सेवा वितरणाविषयी माहिती देणारी एक ध्वनीचित्रफितही दाखवली जाईल. त्यानंतर आलोक प्रेम नागर हे  पंचायती राज संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या सेवा वितरणाची सद्यस्थिती आणि भविष्यातील योजनांबद्दल सविस्तर सादरीकरण करणार आहेत.

या वेबिनारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण प्रशासनात तिसऱ्या पातळीवरील महत्वाचा घटक या नात्याने विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यावश्यक सेवांचा वेळेत आणि प्रभावीपणे पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत पंचायतींची भूमिका किती महत्वाची असते यावर भर देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सोबतच तळागाळातील एकंदर प्रशासनात सुधारण घडवून आणत, सेवांचा प्रभावी पद्धतीने आणि कार्यक्षम रितीने पुरवठा करण्यासाठी  नागरिक केंद्रित हस्तक्षेपित उपाययोजनांना प्राधान्य देण्यावरही या वेबिनारमध्ये भर दिला जाणार आहे.

पंचायती राज संस्था या तळागाळात कार्यरत असतात. महत्वाचे म्हणजे याच संस्था शासनाच्या योजना, कल्याणकारी कार्यक्रम आणि नागरी सेवा ग्रामीण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रशासनात सर्वात आघाडीवर असतात. या संस्थाद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सेवेपासून ते डिजिटल साक्षरता आणि पायाभूत सुविधांच्या विकास अशा व्यापक सेवा - सुविधांचा समावेश आहे. आणि या सर्व सेवा - सुविधा ग्रामीण भागाच्या सामाजिक - आर्थिक विकासाला आकार देण्यासाठी आणि त्यासोबतच लाखो नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या प्रक्रियेतील महत्वाच्या सेवा - सुविधा आहेत.

WhatsApp Image 2024-11-09 at 13.57.29.jpeg  WhatsApp Image 2024-11-09 at 13.57.30.jpeg

या वेबिनारमध्ये सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि माहिती तंत्रज्ञान सचिव सहभागी होणार आहेत. यासोबतच पंचायती राज विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, आकांक्षित जिल्ह्यांचे उपायुक्त / जिल्हा दंडाधिकारी आणि 2022, 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे सर्व राष्ट्रीय ई - गव्हर्नन्स पुरस्कार विजेते आणि त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था (National Institute of Technology - IIT), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था - (National Institute of Technology - NIT)

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (Indian Institutes of Information Technology - IIIT) यांसारख्या प्रमुख संस्थांचे संचालक आणि प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वैचारिक देवाणघेवाणीच्या पातळीवर वेबिनारचे हे सत्र अधिक समृद्ध असेलया सत्राच्या माध्यमातून व्यापक आणि सर्वोत्तम दर्जाची वैचारिक देवाण घेवाण होऊन, सर्वोत्तम कार्यपद्धती सुनिश्चित करण्यात मोठे सहकार्य होणार आहे. हे वेबिनार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या सध्याच्या सेवा वितरण प्रारुपावर चर्चा करण्यासाठी तसेच आपापले प्रशासन अधिक नागरिक केंद्रित करण्यासाठी आणि आपापल्या भविष्यातील योजनांची रूपरेषा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत एक महत्वाचे सहकार्य प्रदान करणारे व्यासपीठच ठरणार आहे.

***

S.Kane/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2072166) Visitor Counter : 36


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil