संरक्षण मंत्रालय
‘भारतीय लष्करी वारसा महोत्सवा’च्या दुसऱ्या आवृत्तीला 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ
भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ‘शौर्य गाथा’हा प्रकल्प करणार सुरू
Posted On:
07 NOV 2024 7:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2024
वार्षिक भारतीय लष्करी वारसा महोत्सवाची (आयएमएचएफ) दुसरी आवृत्ती 8 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत सुरू होणार आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत; यावेळी तीनही दलांचे प्रमुख उपस्थित असतील.
महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ‘शौर्य गाथा’ या प्रकल्पाचा शुभारंभही होणार आहे.हा प्रकल्प लष्करी व्यवहार विभाग आणि भारताच्या ‘युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (यूएसआय) चा एक उपक्रम असून शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून भारताच्या लष्करी वारशाचे जतन आणि संवर्धन करणे,हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
यंदाच्या महोत्सवाला संरक्षण मंत्रालय, लष्करी व्यवहार विभाग (डीएमए), भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), पर्यटन विभाग लडाख, अरुणाचल प्रदेश सरकार, संस्कृती मंत्रालय आणि ब्रिटिश उच्चायुक्तालय यांचा पाठिंबा लाभला आहे.या उपक्रमाचाअधिक तपशील indianmilitaryheritagefestival.in. या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071605)
Visitor Counter : 35