रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून एका दिवसात 120.72 लाख प्रवाशांची वाहतूक
छठ पूजा साजरी करून परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 8-11 नोव्हेंबर या काळात भारतीय रेल्वेकडून 160 पेक्षा जास्त विशेष गाड्यांचे नियोजन
Posted On:
06 NOV 2024 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2024
यंदा सणासुदीच्या काळात 1 ऑक्टोबरपासून ते 5 नोव्हेंबर 2024 पर्यंत गेल्या 36 दिवसांत भारतीय रेल्वेने 4,521 विशेष रेल्वेगाड्यांमधून तब्बल 65लाख प्रवाशांना त्यांच्या इच्छित गंतव्य स्थानी पोहोचवले. या अतिरिक्त सेवेने दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ पूजेच्या सणांनिमित्त प्रवास करणाऱ्यांचा रेल्वे प्रवास सुलभ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेल्वेच्या या विशेष प्रयत्नांमुळे लाखो प्रवाशांना आपापल्या नियोजित स्थळी पोहोचणे सोयीचे झाले. सणासुदीच्या वाढीव गर्दीच्या काळात रेल्वेची मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी असलेली वचनबद्धता दर्शवत, सर्वांना प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली आणि प्रवासही सुलभ केला.
प्रवाशांकडून वाढलेली मागणी लक्षात घेऊन सणासुदीच्या काळात 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024 या काळात भारतीय रेल्वेने एकूण 7,724 विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली. गेल्या वर्षीच्या 4,429 विशेष रेल्वेगाड्यांच्या तुलनेत ही 73% वाढ आहे. सणासुदीच्या काळात प्रवास सुलभ व्हावा या हेतूने विस्तारीकरण झाले. भारतीय रेल्वेने गेल्या चार दिवसांत छठ पूजेसाठी निघालेल्या प्रवाशांना आपापल्या नियोजित स्थळी पोहोचता यावे म्हणून प्रति दिनी सरासरी 175 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या.
छठ पूजा साजरी करून परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 8-11 नोव्हेंबर या काळात भारतीय रेल्वेकडून 160 पेक्षा जास्त विशेष गाड्यांचे नियोजनही करण्यात आले आहे.
4 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय रेल्वेने एका दिवसात तब्बल 120.72 लाख प्रवाशांची वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यामध्ये 19.43 लाख आरक्षित प्रवासी आणि 101.29 अनारक्षित मात्र उपनगरी गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड या दोन देशांमधील मिळून एकूण लोकसंख्येपेक्षा ही प्रवासीसंख्या जास्त आहे. तसेच, याच दिवशी उपनगरी रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्यांची वर्षातील एका दिवसात सर्वाधिक 180 लाख प्रवासी अशा विक्रमी संख्येत नोंद झाली.
S.Bedekar/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2071359)
Visitor Counter : 30