संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय तटरक्षक दलाने, 26 वी राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजना बैठक केली आयोजित

Posted On: 05 NOV 2024 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2024

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) आज 05 नोव्हेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे 26 वी राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजना (NOSDCP) बैठक आयोजित केली होती. भारतीय जलक्षेत्रातील तेल गळती संकटाला प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी देशाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक तसेच राष्ट्रीय तेल गळती आपत्ती आकस्मिक योजनेचे अध्यक्ष परमेश शिवमणी होते.

मेळाव्याला संबोधित करताना, भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक शिवमणी यांनी समुद्रात तेल आणि रासायनिक गळतीसह इतर प्रादेशिक धोक्यांचा सामना करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. भागीदारी मजबूत करण्यासाठी, समन्वय सुधारण्यासाठी आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी भागधारकांमध्ये वर्धित सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असल्याने नौवहनाद्वारे तेल आयातीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे रसायने आणि इतर घातक पदार्थांच्या वाहतुकीसह, भारताचे सागरी क्षेत्र, विस्तृत किनारपट्टी, किनारपट्टीवर राहणारे लोक, सागरी परिसंस्था आणि पर्यटन उद्योगांसमोर आव्हाने उभी राहत आहेत.संभाव्य तेल गळतीपासून सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्रीय समन्वय संस्था, किनारी राज्ये, बंदरे आणि इतर भागधारक यांची जय्यत तयारी सुनिश्चित करणे महत्वाचे आहे.

 

 

S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


 

 

(Release ID: 2071022) Visitor Counter : 49


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil