राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
azadi ka amrit mahotsav

‘खेळ आणि मानवाधिकार : खेळाडूंच्या हक्क आणि कल्याणाचे रक्षण’ या विषयावर एनएचआरसी’ची खुली चर्चा

Posted On: 29 OCT 2024 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2024

 

भारतातल्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी), आज नवी दिल्ली येथील आपल्या प्रांगणात ‘खेळ आणि मानवाधिकार: खेळाडूंच्या हक्क आणि कल्याणाचे रक्षण’ या विषयावर प्रत्यक्ष सहभाग आणि दूरदृश्य प्रणाली अशा संमिश्र पद्धतीने खुल्या चर्चेचे आयोजन केले होते. मानवी मूल्ये जपणे हे खेळभावनेचे वैशिष्ट्य आहे. म्हणून, क्रीडा क्षेत्रातील देशाच्या प्रतिभावंतांच्या चांगल्या कामगिरीसाठी खेळाडूंच्या मानवी हक्कांचा आदर करणे आणि संस्थात्मक यंत्रणेद्वारे त्यांचे संरक्षण सुनिश्चित करणे आवश्यक आहे, असे चर्चेच्या अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या प्रभारी अध्यक्षा विजया भारती सयानी या चर्चेत म्हणाल्या.

alt  alt

खेळाडूंचे हक्क आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी संस्थांची भूमिका यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्याचे महत्त्वही विजया भारती सयानी यांनी अधोरेखित केले.

विजया भारती सयानी यांनी क्रीडापटूंच्या कोणत्याही हक्कांचे उल्लंघन आणि गैरवर्तन झाल्यास खेळाडूंचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायिक यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला.

भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महासंचालक (तपास) अजय भटनागर यांनी खेळाडूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात शून्य सहिष्णुतेवर जोर दिला. क्रीडापटूंच्या सुरक्षेसाठी संस्था, विशेषत: अधिकारात असलेल्या संस्था अधिक जबाबदार कशा असतात यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

alt  alt

चर्चेतून पुढे आलेल्या काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत:

  • क्रीडापटूंची योग्य तयारी करुन घेण्यासाठी त्यांच्या प्रशिक्षकांनी क्लिनिकल सायकॉलॉजीचे प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे;
  • खेळादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे पीडित  खेळाडूंना विम्याचा लाभ मिळणे सुलभ करणे;
  • लैंगिक शोषणाची तक्रार करण्याबाबत खेळाडूंमध्ये जागरुकता निर्माण करणे;
  • लैंगिक छळाच्या तक्रारींवर सर्व क्रीडा संस्थांमधील कार्यात्मक संस्थात्मक यंत्रणेद्वारे कारवाई सुनिश्चित करणे;
  • पॅरा-ॲथलीट्सला पाठिंबा देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे;
  • विविध पार्श्वभूमी आणि उपेक्षित समुदायातील खेळाडूंमध्ये सामाजिक समानता विकसित करण्यासाठी विविध क्रीडा संस्थांमध्ये संस्थात्मक यंत्रणा मजबूत करणे;

alt

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2069418) Visitor Counter : 17


Read this release in: English , Urdu , Hindi