संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वावलंबन प्रदर्शनाचे उद्घाटन

Posted On: 28 OCT 2024 6:16PM by PIB Mumbai

 

नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संघटनेच्या वतीने नवोन्मेषी, स्टार्टअप्स आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या तिसऱ्या वार्षिक स्वावलंबन प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन दालन 14, भारत मंडपम् इथे 28 ऑक्टोबर 2024 इथे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाच्या स्वावलंबन प्रदर्शनाची संकल्पना ‘नवोन्मेष आणि स्वदेशीकरणातून शक्ती आणि सामर्थ्य’ अशी आहे.

जनतेसाठी 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी हे प्रदर्शन खुले असून यामध्ये संरक्षण क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्स व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडून आरेखित व निर्माण केलेले नवोन्मेषी तंत्रज्ञान, संकल्पना आणि उत्पादने मांडली आहेत.

28 ऑक्टोबर रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये संरक्षण नवोन्मेष संघटनेच्या अदिती 2.0 चे आयडीईएक्स योजने अंतर्गत उद्घाटन व त्याचा भाग म्हणून या क्षेत्रातील विविध समस्या आणि आव्हाने यावरच्या चर्चासत्राचा समावेश होता. निधीची गरज असलेले (स्टार्टअप्स/सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग) आणि निधी पुरवठादार (जोखमीचे भांडवलदार आदी) यांना एकत्र आणणे हा यामागील एक उद्देश होता.

29 ऑक्टोबर 2024 रोजी हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत खुले राहील.

***

N.Chitale/R.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2069034) Visitor Counter : 41


Read this release in: English , Urdu , Hindi