ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
या धनत्रयोदशीला विचारपूर्वक खरेदी करा: शुद्धतेसाठी बीआयएस हॉलमार्कवर विश्वास ठेवा
ग्राहक बीआयएस केअर ॲपवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन सत्यापित करू शकतात
Posted On:
28 OCT 2024 6:13PM by PIB Mumbai
धनत्रयोदशीचा सण जसजसा जवळ येत आहे, तसतसे भारतीय मानक ब्युरो (BIS) ग्राहकांना हॉलमार्क असलेल्या सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी अधिक विचारशील दृष्टीकोन अवलंबण्याचे आवाहन करत आहे.
पारंपरिकरित्या, सौभाग्य, संपत्ती आणि भविष्यातील सुरक्षिततेचे प्रतीक म्हणून अनेक कुटुंबे धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. ग्राहकांना हॉलमार्क असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे महत्त्व सांगून विचारपूर्वक खरेदी करण्यास प्रोत्साहित करुन भारतीय मानक ब्युरोने परिवर्तन घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे,
सोन्याच्या दागिन्यांवरच्या हॉलमार्किंगमध्ये 3 खुणा असतात; त्या म्हणजे बीआयएस चे मानक चिन्ह, कॅरेटमध्ये सोन्याची शुद्धता; तसेच 6-अंकी अल्फान्यूमेरिक एचयूआयडी कोड. एचयूआयडी HUID म्हणजे - हॉलमार्किंग युनिक आयडी हा एक युनिक 6-अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे जो प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांच्या नगांवर चिन्हांकित केला जातो.
"आम्ही धनत्रयोदशीच्या काळात आणि त्या नंतरही बीआयएस एचयूआयडी आधारित हॉलमार्कसह ग्राहकांच्या सोन्याच्या गुंतवणुकीचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे भारतीय मानक ब्युरोचे महासंचालक प्रमोद कुमार तिवारी यांनी सांगितले. बीआयएस हॉलमार्क आणि वापरण्यास सुलभ असणाऱ्या बीआयएस केअर ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांनी खरेदी केलेल्या दागिन्यांच्या सत्यतेची खात्री दिली जाऊ शकते." असेही ते म्हणाले
बीआयएस केअर ॲपवरील ‘व्हेरिफाय एचयूआयडी’ आयकॉन वापरून हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर एचयूआयडी’ ची सत्यता पडताळण्यासाठी ग्राहकांना आता अधिकार देण्यात आले आहेत. सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग शुल्क कर वगळून 45 रु प्रति वस्तू इतके आहे. ग्राहक त्यांच्या हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची चाचणी बीआयएस मान्यताप्राप्त असेइंग आणि हॉलमार्किंग सेंटर्स (AHCs) मध्ये 200 रुपये चाचणी शुल्क भरून करू शकतात.
हॉलमार्किंग म्हणजे मौल्यवान धातूच्या दागिन्यांमध्ये मौल्यवान धातूच्या प्रमाणबद्ध सामग्रीचे अचूक निर्धारण आणि अधिकृत नोंदणी होय. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना सोन्याची (किंवा चांदीची) योग्य शुद्धता मिळाल्याचे तृतीय पक्ष आश्वासन आणि समाधान मिळते. बीआयएस च्या हॉलमार्किंग योजनेंतर्गत, हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी सराफांची नोंदणी करून त्यांना मंजूरी दिली जाते तसेच चाचणी दरम्यान आढळलेल्या शुद्धतेच्या आधारावर दागिन्यांचे हॉलमार्किंग करण्यासाठी ॲसेइंग आणि हॉलमार्किंग केंद्रांना मान्यता दिली जाते.
23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींचे अनिवार्य हॉलमार्किंग लागू करण्यात भारतीय मानक ब्युरो पहिल्या टप्प्यात यशस्वी झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा आणि तिसऱ्या टप्प्यात 55 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. हॉलमार्किंग अनिवार्यपणे लागू झाल्यापासून, नोंदणीकृत ज्वेलर्सची संख्या 43,153 वरून 1,93,567 पर्यंत वाढली आहे, तर असेइंग आणि हॉलमार्किंग सेंटर्सची संख्या 948 वरून 1,611 पर्यंत वाढली आहे. याशिवाय, 40 कोटींहून अधिक सोन्याच्या दागिन्यांचे एचयूआयडी द्वारे हॉलमार्किंग केले आहे.
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2069030)
Visitor Counter : 52