दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
दळणवळण आणि सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ITU कॅलिडोस्कोप-2024 परिषदेचा समारोप
आंतरराष्ट्रीय समुदायासोबत झालेल्या सहकार्यामुळे आमची दळणवळण व्यवस्था भविष्यात अत्यंत उपयुक्त होण्यास सक्षम होईल : दूरसंचार विभागाच्या डिजिटल कम्युनिकेशन आयोगाचे सदस्य (सेवा),श्री.रोहित शर्मा,यांचे प्रतिपादन
मानकीकरण प्रक्रियेत तरुणांचा सहभाग केवळ नवोन्मेष आणत नाही तर मानकांसहीत अत्यावश्यक पेटंटच्या निर्मितीसह महत्त्वपूर्ण संधींचे दरवाजे देखील उघडतो : दूरसंचार मानकीकरण धोरण विभागाचे प्रमुख संचालक उपसंचालक श्री.बिलेल जमुसी, यांनी केले अधोरेखित
Posted On:
24 OCT 2024 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2024
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन(आयटीयू)-WTSA 2024 यांनी आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या ITU कॅलिडोस्कोप-2024 या परीषदेचा काल समारोप झाला. यावेळी डिजिटल विभाजन दूर करण्यावर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान वंचित लोकसंख्येला एकत्र आणण्यासाठी अन्वेषण करण्यावर भर देण्यात आला.यावेळी त्यात समानता आणण्यासाठी (स्टँडर्डायझेशन) तरुणांच्या असलेल्या भूमिकेवर महत्त्वाची चर्चा देखील करण्यात आली,ज्यामध्ये विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांनी जागतिक मानकीकरणाच्या प्रयत्नांमध्ये पुढील पिढीला कसे गुंतवून ठेवता येईल याविषयी त्यांचे दृष्टिकोन सामायिक केले.
यावेळी दूरसंचार विभागाच्या डिजिटल कम्युनिकेशन आयोगाचे सदस्य (सेवा),श्री.रोहित शर्मा, यांनी:क्वांटम कंप्युटिंगचे वाटप आणि पोस्ट क्वान्टम क्रिप्टोग्राफी:क्वांटम कंप्युटिंगमधील जोखीम आणि मानकीकरणाचा कल यातील आव्हानांना कसे सामोरे जावे , त्यातील लक्षणीय संधी आणि जोखीम याविषयीच्या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले.त्यातील प्रमुख सत्रात ITU-T अभ्यास गट -17 चे अध्यक्ष प्रा हांग यूल योऊम यांनी क्वांटम कंप्युटिंगमुळे उभ्या ठाकलेल्या सायबरसुरक्षेमधील आव्हानांवर प्रकाश टाकला, तसेच पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफीमधील मानकीकरणाच्या गरजांवर भर दिला.
दूरसंचार विभाग सदस्य (सेवा) श्री.रोहित शर्मा, आपल्या उदघाटनपर भाषणामध्ये म्हणाले, "जेव्हा आपण डिजिटल युगातील आव्हानांवर मात करत पुढे जाण्याचे प्रयत्न करत असतो, त्याचवेळी क्वांटम कंप्युटिंगचा, त्यातील मोठ्या संधी आणि लक्षणीय जोखीमांचा देखील उदय होत असतो. क्रिप्टोग्राफी आणि सुरक्षित कम्युनिकेशन्स(QKD)सारख्या क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये क्रांती घडवण्याची क्षमता आहे, तथापि या क्षेत्रातील नवीन आव्हानांना जागतिक स्तरावर संबोधित केले जाणेही आवश्यक आहे.आंतरराष्ट्रीय समुदायासह तांत्रिक सहकार्य केल्यामुळे आमची कम्युनिकेशन सिस्टीम अतिशय सक्षम होईल.”
"उर्वरित 3 अब्जावधी लोकांना जोडून घेणे" हे तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या चर्चासत्राचे शीर्षक होते.डिजिटल विभाजन नष्ट करण्याच्या गंभीर समस्येवर यादरम्यान लक्ष केंद्रित करण्यात आले होते.यासत्राचे सूत्रसंचालन किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (KAUST), सौदी अरेबिया मधील प्रा.मोहम्मद-स्लिम अलौनी, यांनी केले. या सत्रात एली जू, विपणन आणि धोरण प्रमुख - तारा (TAARA)at X आणि ITU-APT फाउंडेशनचे महासचिव सत्या एन. गुप्ता यांचा समावेश होता.सत्या एन. गुप्ता यांनी पीएम-वाणी (PM-Wani,पंतप्रधान वाय-फाय ऍक्सेस नेटवर्क इंटरफेस) याविषयी सादरीकरण केले, जो भारतातील एक यशस्वी उपक्रम असून ग्रामीण समुदायांना परवडणाऱ्या इंटरनेटमध्ये प्रवेश करण्यासाठी सार्वजनिक वाय-फायचा लाभ देतो.असे स्केलेबल प्रारूप जागतिक स्तरावर डिजिटल समावेश वाढवण्यासाठी आणि डिजिटल विभाजन कमी करण्यासाठी कसे स्वीकारले जाऊ शकते यावर त्यांच्या भाषणात त्यांनी प्रकाश टाकला.
"युवावर्ग आणि मानकीकरण" असे शीर्षक असलेल्या दुसऱ्या चर्चासत्राने दूरसंचार मानकांच्या विकासात तरुणांच्या वाढत्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले.यावेळी ई-लर्निंग, सुरक्षा, दूरसंचार आणि IoT अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज मधील आंतरराष्ट्रीय तज्ञ श्री.शरद अरोरा,यांनी मानक आणि मानकीकरण उपक्रमांची भूमिका या विषयावर सादरीकरण केले, तर दूरसंचार मानकीकरण धोरण विभागातील उपक्रम अधिकारी थॉमस बासिकोलो यांनी आयटीयू मानकीकरण कार्य आणि त्याचे आंतरराष्ट्रीय मानक यावर सादरीकरण केले. याव्यतिरिक्त, एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते,ज्याचे संचालन एडीजी-डिजिटल इंटेलिजन्स, दूरसंचार विभाग श्रीमती कुमुद जिंदाल यांनी केले. यात, -स्टँडर्ड्स अँड रिसर्च ग्रुप एचएफसीएलच्या व्यवस्थापक सोनाली गर्ग,वायरलेस फायनान्सचे एडीजी विनित रंजन ADET- NTIPRIT घ्या दीक्षा धिमान,; आणि, आयआयटी-दिल्ली येथील फायनल इयर,बी.टेक विद्यार्थी अक्षत श्रीवास्तव यांनी सहभाग घेतला होता.या सत्रात 5G, AI, आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी जागतिक मानकांचे भविष्य घडवण्यातील तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. पुढील पिढी सर्वसमावेशक आणि सुरक्षित डिजिटल भविष्य निर्माण करण्यासाठी सक्रियपणे योगदान देईल, हे सुनिश्चित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तरुणांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचे आवाहन करत या सत्राचा समारोप झाला.
“मानकीकरण प्रक्रियेत तरुणांचा सहभाग केवळ नवोन्मेष आणत नाही, तर मानकांच्या आवश्यक निर्मितीसह महत्त्वपूर्ण संधींचे दरवाजे देखील उघडतो. मानकीकरण प्रक्रियेत गुंतून, तुम्ही केवळ जागतिक प्रश्नांवरील उत्तरांसाठी योगदान देत नाही तर भविष्यात यशस्वी उपक्रमांमध्येही स्थान मिळवाल,”असे टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन पॉलिसी विभागाचे प्रमुख आणि डायरेक्टर यांचे डेप्युटी बिलेल जमुसी, यांनी सत्राच्या सुरुवातीच्या आपल्या भाषणात नमूद केले.
रेडिओ कम्युनिकेशन ब्युरो (BR), ITU याचे संचालक मारियो मॅनिविच आणि दूरसंचार विभागाच्या नॅशनल कम्युनिकेशन अकादमीचे डायरेक्टर जनरल देब कुमार चक्रवर्ती, आणि कॅलिडोस्कोप 2024 चे जनरल चेअरमन यांच्या नेतृत्वाअंतर्गत झालेल्या समारोप समारंभाने या परिषदेची सांगता झाली.यावेळी CHF 6000 या स्पर्धेतील सर्वोत्तम तीन शोधनिबंधांना पुरस्कार प्रदान करण्यात आले तर निवडलेल्या शोधनिबंधातील 18 तरुण लेखकांना युवा लेखक प्रमाणपत्रे देण्यात आली.तसेच वैशिष्ट्यपूर्ण तीन प्रकल्पांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
महासंचालक,नॅशनल कम्युनिकेशन अकादमी, गाझियाबाद, दूरसंचार विभाग आणि कॅलिडोस्कोप 2024 चे अध्यक्ष देब कुमार चक्रवर्ती यांनी त्यांच्या समारोपाच्या भाषणात कॅलिडोस्कोप पुरस्कार विजेत्यांचे आणि सर्व सहभागींचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की, या कार्यक्रमाने विचारवंत नेत्यांना दूरसंचारच्या भवितव्याबद्दल विचार मांडण्यासाठी एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे तसेच वैविध्यपूर्ण सादरीकरण करत जागतिक डिजिटल लँडस्केपला आकार देण्यासाठी आणि महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी 6G, IoT, AI आणि क्वांटम कंप्युटिंग सारख्या तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे. येथे मिळालेली अंतर्दृष्टी भविष्यातील धोरणांना मार्गदर्शन करेल, दूरसंचार नेटवर्क वाढवेल आणि लाखो लोकांना त्याचा उपयुक्त वापर करण्यासाठी सक्षम करत, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत जगासाठी योगदान देईल."
भारतातील ऑक्सफर्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील प्रीता शरण आणि अनुप एम उपाध्याय आणि ऑक्सफर्ड कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, मधील आर वसंतन यांनी विकसित केलेल्या स्ट्रोक सर्व्हायव्हर्ससाठी-आर्टिफिशियल इंटेलिजेंस ड्रायव्हन टिल्ट सेन्सर- आधारित स्मार्ट ड्रिंकिंग या उपकरणाला प्रथम पारितोषिक मिळाले.द्वितीय पारितोषिक धनंजय कुमार, मेहल शक्ती एम एस, आणि सोबर्निगा के एस या भारतातील अन्ना विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तसेच राष्ट्रीय माहिती संस्था संप्रेषण तंत्रज्ञान, जपान मधील वेद पी. काफले यांच्या जेष्ठ नागरिकांसाठी, एल्डरली वेलनेस कम्पॅनियन विथ व्हॉईस आणि व्हिडिओ- आधारित आरोग्यातील विसंगती शोधणाऱ्या उपकरणाला प्रदान करण्यात आले.तिसरे पारितोषिक सीएनएन वापरून पॅटर्न ओळख वाढवणारे अँड्रॉइड ॲप अल्फा-बिट या भारतातील क्राइस्ट युनिव्हर्सिटी मधील गोबी रामासामी,अरोकिया पॉल राजन आणि प्रियदर्शनी रेंगासामी तसेच वेस्टर्न केप, आणि दक्षिण आफ्रिका येथील विद्यापीठातील अँटोनी बागुला यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या, उपकरणाला देण्यात आले.
या कार्यक्रमाने सर्वसमावेशकता आणि प्रवेशाद्वारे जागतिक डिजिटल परिवर्तन साध्य करण्यासाठी सतत सहकार्य करण्याच्या महत्त्वावर विशेष करून भर दिला.
आयटीयू(ITU) कॅलिडोस्कोप बद्दल
शैक्षणिक आणि उद्योगक्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यासाठी, दूरसंचार तंत्रज्ञानाच्या जागतिक मानकीकरणात योगदान देणाऱ्या विचारांच्या देवाणघेवाणीला चालना देणारा आयटीयू कॅलिडोस्कोप हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण वार्षिक उपक्रम आहे.2008 मध्ये त्याची स्थापना झाली असून तेव्हापासून, कॅलिडोस्कोप डिजिटल कम्युनिकेशनच्या हे भविष्यातील विषयांवर चर्चा करण्यासाठी ते सर्वात प्रभावशाली व्यासपीठ बनले आहे, जिथे संशोधक आणि नवोन्मेषक त्यांचे सर्वात आशादायक कार्य सादर करू शकतात.
ITU Kaleidoscope 2024 अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://www.itu.int/en/ITU-T/academia/kaleidoscope/2024/Pages/default.aspx
किंवा
Google मध्ये ITU Kaleidoscope 2024 टाइप करा आणि प्रथम प्रदर्शित केलेले संकेतस्थळ निवडा,त्यावर कार्यक्रमाचा पूर्ण तपशील,वक्ते आणि सत्रांबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
WTSA 2024 बद्दल:
इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन (ITU) द्वारे आयोजित WTSA 2024,हे व्यासपीठ जागतिक दूरसंचार मानकांच्या विकासासाठी आणि अंमलबजावणीसाठी, नियामक, उद्योग नेते आणि धोरणकर्ते यांना एकत्र आणत जगभरातील संप्रेषणांचे भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून काम करते.
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2067779)
Visitor Counter : 38