संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाई दल आणि सिंगापूरचे हवाई दल यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षणाला पश्चिम बंगालमधील हवाई दलाच्या तळावर सुरुवात
Posted On:
21 OCT 2024 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
भारतीय हवाई दल आणि सिंगापूरचे हवाई दल यांच्यातील 12 व्या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला 21ऑक्टोबर 2024 रोजी, पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा येथील हवाई दलाच्या तळावर सुरुवात झाली.
हा द्विपक्षीय सरावाचा दुसरा टप्पा 13 ते 21 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित केला जाईल. या अंतर्गत दोन्ही दलांमध्ये प्रगत हवाई लढाऊ तंत्र, संयुक्त मोहिमांचे नियोजन आणि माहितीपूर्ण सत्रांमध्ये घनिष्ट सहकार्य वृद्धिंगत होऊन घनिष्ठ सहकार्य वाढीला लागण्याची अपेक्षा आहे. आंतरकार्यक्षमता वाढवणे, युद्ध सज्जतेत वाढ आणि दोन हवाई दलांमधील सर्वोत्तम पद्धतींसंदर्भातील ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हे या द्विपक्षीय टप्प्याचे उद्दिष्ट आहे.
सिंगापूरचे हवाई दल आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह या लष्करी सरावात भाग घेत असून त्यामध्ये F-16, F-15 स्क्वॉड्रन मधील विमान क्रू आणि सहाय्यक कर्मचारी आणि G-550 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) आणि C-130 विमानांचा समावेश आहे. तर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल, मिराज 2000 ITI, Su-30 MKI, तेजस, मिग-29 आणि जग्वार विमानांचा समावेश आहे.
संयुक्त लष्करी सराव त्याच्या आरंभापासूनच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांच्या कक्षेत घेतला जातो. भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या तरंग शक्ती या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय हवाई कवायतींमध्ये सिंगापूरच्या हवाई दलाने सहभाग घेतला होता आणि आता त्यापाठोपाठ संयुक्त लष्करी सराव देखील आयोजित करण्यात आला आहे. तरंग शक्तीहे दोन हवाई दलांमधील वाढत्या व्यावसायिक संबंधाचे प्रतिबिंब आहे. हवाई संचालना व्यतिरिक्त, दोन्ही हवाई दलांचे कर्मचारी सर्वोत्तम सराव पद्धतींची देवाणघेवाण करतील, आणि पुढील सात आठवड्यांच्या कालावधीत अनेक क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधतील.
संयुक्त लष्करी प्रशिक्षण -2024 मध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यातील अनेक वर्षांचे सहकार्य, संयुक्त सराव, तसेच परस्परांप्रती असलेल्या आदरभावातून निर्माण झालेल्या मजबूत द्विपक्षीय संरक्षण संबंध अधोरेखित करण्यात आले आहेत.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066793)
Visitor Counter : 44