विशेष सेवा आणि लेख
azadi ka amrit mahotsav

खेलो इंडिया स्पर्धांमुळे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली : केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 20 OCT 2024 4:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 ऑक्‍टोबर 2024

 

महिलांच्या खेलो इंडिया अस्मिता साखळी स्पर्धांमुळे (Khelo India ASMITA Women league) राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या महिला खेळाडूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. केरळची राजधानी  तिरुवनंतपुरम इथे नव्याने उभारलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रादेशिक केंद्राअंतर्गतच्या लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या ( SAI RC LNCPE) मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.  या वसतिगृहात एकूण 300 खाटांची सोय आहे. या वसतिगृहाच्या माध्यमातून आपल्या देशाच्या युवा महिला खेळाडूंच्या भवितव्याच्या दृष्टीने होत असलेल्या महत्त्वाच्या गुंतवणूकीचीच प्रचिती येते असेही केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी यावेळी नमूद केले. 2036 साली होणाऱ्या ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविण्याचे भारताचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

   

क्रीडापटूंनी खेळाकडे केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग म्हणून पाहू नये अशी सूचना त्यांनी केली. त्याउलट खेळाडूंनी देशासाठी खेळले पाहिजे, पदके जिंकली पाहिजेत आणि देशाचे नाव उज्ज्वल केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. एखाद्या खेळाडूने पदक जिंकल्याने केवळ त्या खेळाडूचा आणि त्यांच्या प्रियजनांनाच सन्मान होतो असे नाही, तर त्यांच्या अशा प्रकारच्या यशाकडे सामूहिक गौरवाची बाब म्हणून पाहात असलेल्या संपूर्ण देशाचा सन्मान होत असतो असे म्हणत केंद्रीय मंत्री मनसूख मांडविया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या पंच प्रणांचाही पुनरुच्चार  केला.

   

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2066520) Visitor Counter : 77


Read this release in: Urdu , English , Hindi , Malayalam