संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या आयएनएस शार्दुलने दुबई येथील बंदर भेटीचा कालावधी पूर्ण केला
Posted On:
18 OCT 2024 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2024
भारतीय नौदलाच्या आयएनएस शार्दुल या युद्धनौकेने, पोर्ट रशीद, दुबई, संयुक्त अरब अमिरात (युएई) येथे, लांब पल्ल्याच्या प्रशिक्षण तैनातीचा भाग म्हणून, दिलेल्या आपल्या भेटीचा कालावधी 16 ऑक्टोबर 24 रोजी पूर्ण केला. ही भेट, भारत आणि युएई दरम्यानचे सागरी सहकार्य बळकट करण्यामधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरली. पोर्ट कॉलदरम्यान, युएईच्या नौदलाबरोबर संवाद, परस्पर प्रशिक्षण भेटी, आणि स्थानिक समुदायाला भेट देऊन संवाद साधणे, या उपक्रमांचा समावेश होता.
आयएनएस शार्दुलच्या सागरी प्रशिक्षणार्थींनी नौदल अधिकारी प्रशिक्षण अकादमीला भेट दिली. युएई नौदलाच्या युद्धनौकांनी त्यांना व्यावसायिक संवादाची आणि सामायिक ज्ञान आणि प्रशिक्षण पद्धतींवर अर्थपूर्ण चर्चा करण्याची संधी दिली. संयुक्त प्रशिक्षण सत्र, योगसाधना उपक्रम आणि मैत्रीपूर्ण खेळ, ही या भेटीची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आयएनएस शार्दुल युद्धनौकेवर आयोजित करण्यात आलेल्या औपचारिक स्वागत समारंभाला युएई नौदलाचे अधिकारी आणि कर्मचारी, मुत्सद्दी आणि युएईमधल्या भारतीय समुदायातील प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते.
दुबईहून निघताना आयएनएस शार्दुलने, ‘अल कुवैसात’ या युएई नौदलाच्या जहाजाबरोबर सागरी भागीदारी कवयातींमध्ये भाग घेतला. दोन्ही नौदलांच्या जहाजांनी नौदल युद्ध सराव, परस्पर संवाद, आणि समन्वित कवयती केल्या आणि परस्पर समन्वय आणि एकमेकांबरोबर काम करण्याची क्षमता प्रदर्शित केली.
भारतीय नौदलाच्या युद्धनौकेची दुबई येथील भेट, भारत-यूएई सागरी संबंधांचे महत्त्व अधोरेखित करते आणि हिंद महासागर क्षेत्रासाठीच्या, SAGAR (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) या दृष्टीकोनाला अनुसरून, सागरी क्षेत्रातील क्षमता विकासाप्रति असलेली वचनबद्धता अधोरेखित करते.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066195)
Visitor Counter : 37